Monday, 22 December 2014

Health Insurance Myths & Facts / हेल्थ इंशुरंस समज आणि गैरसमज - 5

गैरसमज :  नेटवर्क हॉस्पिटलची लिस्ट पाहूनच पॉलीसी घेण्याचा निर्णय घ्यावा.
माझ्या बऱ्याच ग्राहकमित्रांची मागणी असायची कि बॉस, पॉलीसी घेण्याआधी आम्हाला नेटवर्क हॉस्पिटलची लिस्ट पहायची आहे, आम्ही त्यावरून काय तो निर्णय घेऊ. मग त्यांना मला हे समजवावं लागायचं कि हि लिस्ट कायमच बदलत असते अगदी रोजच्या-रोज देखील ! कारण इंशुरंस/TPA  कंपन्या हॉस्पिटल्सला त्यांच्या काही चुकांसाठी लिस्टमधून काढत असतात किंवा काही हॉस्पिटल्स उशीरा पेमेंट दिल्यामुळे इंशुरंस/TPA कंपन्यासोबतचे काम थांबवतात.
सल्ला : हेल्थ इंशुरंस पॉलीसी कशी आहे आणि ती तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करते का ते पाहून निर्णय घ्या, त्या कंपनीची हॉस्पिटलची लिस्ट पाहून नको - कारण लिस्ट कधीपण बदलु शकते - अगदी आत्तासुद्धा !

No comments:

Post a Comment