Friday, 19 December 2014

Health Insurance Myths & Facts / हेल्थ इंशुरंस समज आणि गैरसमज - 2

गैरसमज : क्याशलेस सुविधा किंवा क्लेम मिळवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये किमान 24 तास भरती राहावच लागत.
अजूनही असे प्रसंग आपल्याला हॉस्पिटलच्या क्लेम/बिलिंग विभागात पहावयास मिळतात कि, रुग्णाचे नातेवाईक सांगत राहतात कि कृपा करून आमच्या रुग्णाला 24 तास पूर्ण होण्याच्या आत डिस्चार्ज करू नका नाहीतर आमचं क्याशलेस होणार नाही किंवा आम्हाला क्लेम नाही करता येणार. यामागचं कारण सुद्धा आपले एजंट आणि इंशुरंस कंपन्यांच्या जाहिराती आहेत, कारण पॉलीसी मध्ये जरी अस लिहिल असल कि क्याशलेस सुविधा किंवा क्लेम मिळवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये किमान 24 तास किंवा त्यापेक्षा जास्त काळ रुग्ण भरती असणे अनिवार्य आहे तरी या वाक्याचा तंतोतंत अर्थ काढून उपयोगाचे नाही.
थोडक्यात काय तर, hospitalization / रुग्णास हॉस्पिटलमध्ये भरती होणे अनिवार्य होतेका ते इंशुरंस कंपन्यां / TPA चे अधिकारी ठरवतात आणि मगच क्याशलेस सुविधा किंवा क्लेम मंजूर करतात. उदा.  मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आजकाल 24 तास लागतच नाहीत तरीसुद्धा आपणास क्याशलेस सुविधा किंवा क्लेम मिळू शकतो.
लक्षात घ्या : फक्त आरोग्य तपासण्याकरीता भरती होऊन आपणास क्याशलेस सुविधा किंवा क्लेम मिळू शकत नाही. चुकीची वैद्यकीय माहिती देऊन, इंशुरंस कंपन्यां / TPA च्या अधिकाऱ्यांची दिशाभूल करून क्याशलेस सुविधा किंवा क्लेम मिळवण्याचा प्रयत्न केल्यास आपल्यावर तसेच संबंधित हॉस्पिटलवर कायदेशीर कार्यवाही होऊ शकते त्यामुळे खरी आणि योग्यतीच माहिती द्या.

No comments:

Post a Comment