Thursday, 18 December 2014

Health Insurance Myths & Facts / हेल्थ इंशुरंस समज आणि गैरसमज 1

गैरसमज : माझ्याकडे क्याशलेस कार्ड आहे म्हणजे मला काही पैसे भरावे लागणार नाहीत 

अगदी सुरुवातीच्या काळामध्ये फक्त मेडिक्लेम योजना होत्या आणि जेव्हापासून  अजून चांगली सेवा देण्याहेतु क्याशलेस संकल्पना सुरु करण्यात आली तेंव्हापासून क्याशलेस हा एक परवलीचा शब्द होऊन बसला आहे. खरंतर हेतु हा होता कि लोकांना बँकमध्ये जाऊन पैसे काढावे लागू नये आणि रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होऊ नये. पण आजकाल या संकल्पनेमागच्या  खऱ्या अर्थाचा विपर्यास झालेला दिसून येतो ज्याला कारणीभूत आपले एजंट आणि इंशुरंस कंपन्यांच्या जाहिराती आहेत.

पहिले तर हे क्याशलेस नक्की कसं काम करतं ते थोडक्यात समजून घेऊया, इंशुरंस कंपनीने आपल्याला हेल्थ इंशुरंस एकदा विकला कि (बऱ्याचदा निवडून आलेल्या पुढाऱ्यासारखे गायब होतात) मग त्यांनी निवडलेल्या TPA  कडे आपलं काम सोपवलं जात हे TPA आपला क्लेम हा योग्य आहे कि नाही ते परिक्षणान्ति ठरवतात, म्हणजेच काय तर आपण आपल्या रुग्णाला तातडीने जरी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असलं तरी जो पर्यंत आपण आपले सर्व कागदपत्रं हॉस्पिटलला जमा करत नाही आणि TPA  हॉस्पिटलला मंजुरी देत नाही देत नाही तो पर्यंत त्याला टेक्निकली क्याशलेस म्हणता येत नाही. त्यातून काही हॉस्पिटल रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून तसेच एक चांगुलपणा म्हणून काही पैसे डीपोसीट म्हणून घेऊन ठेवतात आणि उपचार सुरु करतात. वाद इथे होतात. 

उपाय: हेल्थ इंशुरंस चे कागदपत्र कायम पटकन सापडतील (कुणालाही)असे ठेवा. काही रक्कम या वेळेसाठी बाजूला काढून ठेवा. क्रेडीट कार्ड अशा वेळेस चटकन उपयोगास येतं. 

No comments:

Post a Comment