Sunday, 21 December 2014

Health Insurance Myths & Facts / हेल्थ इंशुरंस समज आणि गैरसमज - 4

गैरसमज : पॉलीसी घेतांना डे- केअर प्रोसिजरची लिस्ट ज्याची मोठी तो हेल्थ इंशुरंस चांगला.
आजकाल बऱ्याच खासगी इंशुरंस कंपन्या मोठ-मोठ्या जाहिराती करत असतात आणि त्यात असं भासवल जात कि त्या कंपन्या इतर कंपन्यापेक्षा जास्त डे- केअर प्रोसिजर कव्हर करतात. एखादी इंशुरंस कंपनी प्रत्येक छोटी प्रोसिजर वेगळी काढून एक छान मोठी डे- केअर प्रोसिजरची लिस्ट तयार करू शकते पण तेव्हाच एखादी दुसरी कंपनी जिची डे- केअर प्रोसिजरची लिस्ट छोटी असते ती आधीच्या कंपनी पेक्षा जास्ती प्रोसिजर कव्हर करू शकते ! कारण शेवट इंशुरंस कंपनी एखाद्या प्रोसिजरची व्याख्या कशी करते ते महत्वाचं. मार्केटिंग गिमिक दुसरं काय.
लक्षात घ्या : डे- केअर प्रोसिजरच्या लिस्टची तुलना करू नका, एखादी छोटी लिस्ट एखाद्या मोठ्या लिस्टपेक्शा जास्त कव्हरेज देऊ शकते.

No comments:

Post a Comment