पुण्यातील रुग्णालयांमधील क्याशलेस सेवा बंद ?!
सध्या तुम्ही रोज वर्तमानपत्रामध्ये या रिलेटेड बातम्या वाचतच असाल. पण मग म्हणजे नक्की झालं काय आहे ते समजल आहे ना ?
मी
सांगतो जे मला उमगलंय, ज्या चार निम्न-सरकारी (P.S.U.) इंश्युरन्स कंपन्या
आहेत (National, New India, Oriental आणि United India) त्यांनी एकत्र
येउन एक संघटना केली ज्याला नाव दिले GIPSA. आता या संघटनेने भारताच्या
प्रत्येक प्रमुख शहरात PPN नावाची योजना राबवली. आता हि PPN योजना म्हणजे
नक्की काय तर, GIPSA ने ठरवले कि शहरातील काही ठराविकच हॉस्पिटल मध्ये
क्याशलेस सेवा चालू ठेवायची आणि बाकी सर्व हॉस्पिटल मध्ये क्याशलेस सेवा
बंद करायची. याचा फायदा GIPSA म्हणजेच इंश्युरन्स कंपन्यांना असा होणार आहे
कि त्यांचा उपचारांवरचा खर्च कमी होणार आहे, कारण ते या मार्गे सर्व
हॉस्पिटल्सला कोंडी मध्ये पकडून कमी दरांमध्ये उपचार देण्यास भाग पाडणार
आहेत.
पण मग अनेक प्रश्न उपस्थित होतात जस कि;
1. उपचारांचे दर कमी झाले तरी प्रिमियम काही कमी होत नाहीये. सामान्य माणसाला त्याचा काहीच फायदा दिला जात नाहीये असं दिसतंय.
2. काय सरकारी कंपन्या असा अचानक निर्णय घेऊ शकतात ? ज्याचा सामान्य माणसाला त्रास होऊ शकेल ?
3. मेडिक्लेम घेतांना माणूस हे बघतो कि आपल्या घराजवळच किंवा विश्वासाचं हॉस्पिटल त्या इंश्युरन्स कंपनीच्या यादीमध्ये आहे ना ! आणि आता जर ते वगळल गेलं असेल तर ?
4. अजून एक जळजळीत प्रश्न, कि कॉर्पोरेट पॉलीसी असणाऱ्यांना असे निर्बंध नाहीत ! हे सर्व निर्बंध फ़क्त स्वतः पॉलीसी विकत घेणाऱ्या लोकांसाठीच आहेत !! तर असा भेदभाव का ?
5. बर,
हॉस्पिटल्सला कमी दरामध्ये तेच ऑप्रेशन करायला भाग पाडल्यामुळे मिळणाऱ्या
सेवा-सुविधा किंवा वापरलं जाणार मटेरियल जर हलक्या दर्ज्याच वापरावं लागलं
तर ? ती चूक कोणाची ? आपण नेहमी ज्यांना हक्काने कोसतो त्या हॉस्पिटल्सची ?
खरतर प्रत्येकाची या घटनेवरती आपली एक प्रतिक्रिया आहे.
उपाय आणि पर्याय अनेक आहेत यावर माझ्याकडे … पण तुम्हाला काय वाटत ?