Wednesday, 3 August 2016

गृहकर्ज / होमलोन परतफेडीची मुदत / कालावधी जितका जास्त तितके आर्थिक नुकसान जास्त !

साधारणतः सर्व बँकांकडून होम लोन या प्रकारासाठी जास्तीत जास्त 30 वर्षे परतफेडीचा कालावधी दिला जातो.  जितका परतफेडीचा कालावधी जास्त, तितका EMI कमी होतो आणि त्यामुळे बहुतांशी सर्वजण 25 ते 30 वर्ष मुदतीकरता लोन घेतात. परंतु कमीतकमी कालावधीकरता लोन घेणे हेच चांगले आणि फायद्याचे असते. जास्त कालावधीकरता कर्ज / लोन घेतले तर व्याजापोटी खूपच जास्त पैसे भरावे लागतात. टक्क्यांमध्ये समजवायचे झाले तर, समजा 10 वर्ष मुदतीने लोन घेतले तर त्यावर मुद्दलाच्या 57% व्याजच भरावे लागते आणि समजा 20 वर्षे मुदतीने घेतले तर मुद्दलाच्या 128% व्याज पडते !  

म्हणजे समजा तुम्ही 50 लाखांचे गृहकर्ज / होम लोन 25 वर्षांकरता घेतलेत तर तुम्ही मुद्दला व्यतिरीक्त 83.5 लाख रुपये (किंवा टक्क्यांमध्ये सांगायचे झाले तर 167%) फक्त व्याज भरता.  


कधीकधी, जास्त मुदतीचे / कालावधीचे कर्ज / लोन घेणे गरजेचे असते कारण एखाद्या तरुण व्यक्तीस 10 वर्षांच्या मुदतीचा EMI (जो त्या वेळी खूपच जास्त वाटू शकतो) भरणे अशक्य असते पण मग अशा वेळेस आपला EMI आपण दरवर्षी किंवा दर 2-5 वर्षाने वाढवू शकतो जेणेकरून आपण लवकरात लवकर कर्ज मुक्त होऊ शकू आणि घराच्या किमतीइतके किंवा त्याहून जास्त रकमेचे व्याज वाचवू शकतो.  

ग्रामपंचायत किंवा गुंठेवारी प्रॉपर्टी विकत घेतलेल्या लोकांना व्याजदर खूपच जास्त पडतो 11 ते 14 टक्के, अशा लोकांनी जर आपले गृहकर्ज / होम लोन दुसऱ्या बँकमध्ये ट्रान्सफर केले तर व्याजदर कमी मिळू शकतो ज्यामुळे काही लाख रुपयांची बचत होऊ शकते. 

कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी / लोन साठी योग्य सल्ला आणि मार्गदर्शन मिळणे खूप महत्वाचे असते.

तुमची कागदपत्रे घेऊन आजच ऑफिसला भेट दया 

श्रद्धा फिन-सॉल 
मधु-विमल बिल्डिंग,
2रा मजला, शाहू कॉलेज रोड,
दत्तवाडी पोलीस स्टेशनशेजारी,
लक्ष्मीनगर, पुणे 09
फोन: 9503045951 / 9822513801

Saturday, 21 May 2016

Sunday, 8 May 2016

झटपट श्रीमंत होण्याचा हव्यास !

सध्या पुण्यामध्ये शेअरमार्केट संबंधित क्लासेसचा सुळसुळाट झालेला आहे, पाच दिवसाचा कोर्स करून रोज दोन-पाच हजार रुपये जर कमावता आले असते तर लोक पाच-पाच वर्षे अभ्यास करून, वाया घालवून, डॉक्टर किंवा इंजिनिअर का झाले असते ? 

वॉरेन बफे नावाचा जगातील सर्वात श्रीमंत माणूस शेअर्समध्ये गुंतवणूक केली म्हणूनच इतका श्रीमंत झाला हे जरी खरे असले तरी, मित्रांनो तो काही असा पाच दिवसांचा शेअर ट्रेडिंगचा कोर्स करून श्रीमंत नाही झाला ! ! तर  वॉरेन बफे यांनी संशोधन करून चांगल्या शेअर्समध्ये लांब पल्ल्याची गुंतवणूक केली म्हणून ते इतके श्रीमंत झाले, आणि लांब पल्ला म्हणजे किमान ५ ते १० वर्षे. 

जसे एकाच औषधाचा सर्व रोगांवर किंवा सर्व पेशंटला समान गुण येत नाही, त्याच प्रमाणे तुमच्या आर्थिक गुंतवणूकीवर आकर्षक परतावा मिळण्यासाठी योग्यते मार्गदर्शन (औषध) मिळणे खूप महत्वाचे असते.   

श्रद्धा फिन-सॉल या आमच्या कंपनीमध्ये आम्ही आमच्या क्लायंटना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन आणि सुयोग्य सल्ला देऊन श्रीमंत बनण्यास मदत करतो. महिना पाचशे रुपयांपासून ते पाच लाखांपर्यंत गुंतवणूक करणारे आणि रिक्षावाल्या काकांपासून ते यशस्वी उद्योजकांपर्यंत आमचे सर्वच प्रकारचे क्लायंट आहेत. 

तुम्ही कधी येणार आहात भेटायला ??

Tuesday, 29 March 2016

हेल्थ इज वेल्थ ? नक्की ?

हेल्थ इज वेल्थ म्हणत फक्त हेल्थकडे लक्ष देऊन चालत नाही, कारण वेल्थकडे दुर्लक्ष केले कि काही वर्षांनी टेन्शनमुळे हेल्थ देखील खराब होते.
जसं नियमित व्यायाम आणि चौरस आहार यामुळे शरीर काही वर्षांनी तंदुरुस्त होऊ शकतं, तसंच नियमित बचत आणि चौरस आर्थिक गुंतवणूक यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती काही वर्षांनी तंदुरुस्त होते.
मुद्दा हा आहे कि, जसे आपण आपले कुटुंब, नातेसंबंध, ऑफिसमधील किंवा व्यवसायामधील काम, शारीरिक स्वास्थ्य या मध्ये जातीने लक्ष घालतो आणि प्रत्येकामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करतो, त्याच प्रमाणे आपले आर्थिक गुंतवणुकीबद्दलचे ज्ञान वाढवणे आणि योग्य मार्गदर्शनाखाली चौरस गुंतवणूक करणे तितकेच महत्वाचे आहे.
श्रीमंत होण्यासाठी प्रत्येकजण धडपड करतो, परंतु हि धडपड फक्त मला आज पेक्षा उद्या आणि या महिन्यापेक्षा पुढल्या महिन्यात जास्त पैसा कसा मिळेल याच एका उद्दिष्टाने पछाडलेली असते. लोकांना यश मिळते देखील, उत्तरोत्तर मिळणारा पैसा वाढत जातो, पण हात-पाय हलायचे थांबले कि परिस्थिती बिकट होते. माणूस आपल्याच नातेवाईकांचा, मुलाबाळांचा, परिस्थितीचा गुलाम बनून जातो.
यावर मार्ग म्हणजे, आमच्या मागील लेखाप्रमाणे,
1. नियमित बचत (Regular Saving n Hedging)
2. आर्थिक व्यवस्थापन (Financial Planning) आणि गुंतवणूक (Investment) ज्यायोगे,
3. तुमचे निष्क्रीय उत्पन्न ( Passive Income) हे तुमच्या सक्रिय उत्पन्नाइतके (Active Income) करणे, हाच तुमचा आर्थिक स्वातंत्र्याचा (Financial Liberty) फॉर्म्युला आहे.
पटत असेल तर शेअर करा आणि वेळ काढून एकदा आमची भेट घ्या.
शिरीष कुलकर्णी
सी.ई. ओ.
श्रद्धा फिन-सॉल
कृष्ण लीला चेंबर,
2रा मजला, टिळक रोड,
एस.पी.कॉलेज समोर,
सदाशिव पेठ, पुणे 30
फोन: 9822513801

Monday, 29 February 2016

म्युचल फंड आणि tax benefit, वाचा आणि शेअर करा !

गुंतवणूकदारांना बऱ्याचदा असा प्रश्न पडतो कि आपण ज्या म्युचल फंडमध्ये गुंतवणूक केली आहे त्याचा फायदा सेक्शन 80C अंतर्गत आपल्याला नक्की मिळेल ना ? तर हा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे कारण बहुतांशी लोक फक्त tax benefit मिळावा या उद्देशानेच म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करतांना दिसतात. परंतु फक्त काही प्रकारच्या म्युचल फंडमध्ये केलेली गुंतवणूकच तुम्हाला 80C अंतर्गत करसवलत देऊ शकते आणि आपण निवडलेला म्युचल फंड जर नेमका त्या प्रकारामध्ये मोडत नसेल तर आपणाला 80C चा कोणताही फायदा मिळू शकणार नाही. 

त्यामुळे म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वीच आपण सर्व माहिती व्यवस्थित घेणे अतिशय महत्वाचे असते. तसेच कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणुकीचा एक आराखडा तयार असणे गरजेचे असते. एकदा गुंतवणूक केली कि नंतर त्यास सुधारणे अतिशय अवघड आणि नुकसानदायक ठरू शकते.
तर आपण पाहूया असे फंड्स ज्यात tax benefit मिळू शकते;
Equity Linked Savings Scheme: इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम  प्रकारच्या फंड मध्ये जास्तीत जास्त एक लाख रुपयांची गुंतवणूक सेक्शन 80C अंतर्गत मोडते. आपण जर सिप किंवा SIP द्वारे गुंतवणूक करीत असाल तरी ते चालू शकते. साधारणतः ELSS मध्ये तुम्हाला कमीतकमी तीन वर्षे तुमची गुंतवणूक ठेवावीच लागते, म्हणजेच काढता येत नाही परंतु हा कालावधी तसा PPF किंवा NSC पेक्षा बराच कमी आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. 
इतर सर्व स्कीम / फंड प्रमाणेच या प्रकारच्या फंड मध्ये देखील डिव्हीडन्ट आणि ग्रोथ असे दोन्ही पर्याय  उपलब्ध आहेत. 
Rajiv  Gandhi Equity Savings Scheme (RGESS) तसेच काही Pension Plan (निवृत्ती योजना ) देखील करसवलत देऊ शकतात.
फक्त tax benefit साठी कोणतीही गुंतवणूक करू नका, तर तुमचा पैसा महागाईच्या भविष्यातील दरापेक्षा जास्त पटीने कसा वाढेल याचा देखील विचार केला गेला पाहिजे, त्याच सोबत फक्त म्युचल फंड किंवा फक्त जमीन किंवा फक्त सोने अशी एकाच प्रकारची गुंतवणूक करणे टाळून, सर्व प्रकारांमध्ये योग्य मार्गदर्शनाखाली केलेली गुंतवणूक तुम्हाला खात्रीशीर श्रीमंत बनवू शकते. 
बरेचसे मोठे / धनाढ्य गुंतवणूकदारदेखील त्यांच्या इतर गुंतवणुकिंसोबतच म्युचल फंडमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात ज्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांचा पोर्टफ़ोलिओ परीपूर्ण बनतो.
तर आजच आम्हाला भेटण्यासाठी आमची वेळ घ्या
शिरीष कुलकर्णी 
श्रद्धा फिन-सॉल 
कृष्ण लिला चेम्बर्स, 
2रा मजला, टिळक रोड,
स.प. महाविद्यालयासमोर, पुणे 30
फोन : 9822513801

Saturday, 30 January 2016

अजून किती वर्षे तुम्ही नोकरी किंवा व्यवसायामधून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून जगणार आहात?

तुमचे सक्रीय उत्पन्न ( Active Income) आणि निष्क्रीय उत्पन्न ( Passive Income) समान आहे का ?
सक्रिय उत्पन्न: तुमचे मासिक उत्पन्न.
उदा. नोकरी, व्यवसाय या मधून मिळणारा पैसा.
निष्क्रीय उत्पन्न: कोणतेही काम / व्यवसाय न करता मिळणारे उत्पन्न.
उदा. फिक्स्ड डिपॉझिटचे व्याज किंवा अन्य कोणत्याही गुंतवणुकीवर मिळणारा परतावा, फ्लॅट किंवा दुकानाचे भाडे वैगरे.
बहुदा हे वाचतांना तुम्ही थोडेतरी अंतर्मुख झाले असाल. एक वेळ अशी आली पाहिजे कि तुम्ही काहीही काम (उत्पन्नासाठी/ उपजिवीकेसाठी) केले नाही तरी तुम्ही आत्ता ज्या लाईफ स्टाईलने जगत आहात तसेच कायम राहू शकाल.
जर तुम्हाला वाटत असेल कि आम्ही हे कोण्या इन्शुरन्स बद्दल सांगत असू तर तसे नाहीये.
आम्ही तुमचे संपूर्ण आर्थिक व्यवस्थापन अशा पद्धतीने करू शकतो कि ज्यामुळे तुम्हाला तुमच्या नोकरी किंवा व्यवसायावरती अवलंबून राहावे लागणार नाही, तुमचे निष्क्रीय उत्पन्न (Passive Income) हे तुमच्या भविष्यातील सक्रीय (Active Income) मासिक उत्पन्ना इतके करायचे असेल तर आम्हाला भेटा.
शिरीष कुलकर्णी
श्रद्धा फिन-सॉल
319, 2रा मजला,
शनिवार पेठ,
सुयोग मंगल कार्यालयाशेजारी,
पुणे 30
फोन: 9822513801
(भेट फक्त पूर्वनियोजित वेळेप्रमाणेच)

म्युच्युअल फंड कि डायरेकट शेअर्स

पहिले तर तुमचे अभिनंदन जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर ! कारण अजूनही लोकांना दोन्हीमधील बेसिक फरक देखील माहित नाहीये आणि ते बापडे अजूनही त्यांच्या इन्शुरन्सला किंवा फार तर एफ.डी.ला त्यांची आर्थिक गुंतवणूक मानण्यात धन्य आहेत. असो.
म्युच्युअल फंड मध्ये आकर्षक परतावा मिळण्यासाठी देखील इक्विटी स्कीम मध्ये गुंतवणूक करणे अपेक्षित असते, याचाच अर्थ म्युच्युअल फंड मध्ये देखील रिस्क हि असतेच (कोणतीही म्युच्युअल फंडची जाहिरात आठवा)
तर रिस्क असतेच परंतु ती डायरेकट इक्विटी पेक्षा कमी असू शकते जर तुमचा म्युच्युअल फंडचा फंड मॅनेजर चांगला असेल, तो सेक्टर चांगला परफॉर्म करत असेल ई.
परंतु सगळेच म्युच्युअल फंड चांगली कामगिरी करत नाहीत बरं का.
(उदा.मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासारखे असते)
परंतु म्हणजे डायरेकट इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे इतके धोकादायक असते का ? तर नाही, ते सर्वस्वी तुमच्या ब्रोकर वरती किंवा जर तुम्ही स्वतः तुमचे निर्णय घेत असाल तर तुमच्यावर अवलंबून असेल.
(उदा. तुमचा विश्वासू फॅमिली डॉक्टर किंवा जवळचे हॉस्पिटल)
म्युच्युअल फंड कि डायरेकट इक्विटी याचे उत्तर हे व्यक्तीनुरूप बदलते, दोन्हीचे काही फायदे आहेत आणि काही तोटेदेखील आहेत, म्हणून श्रद्धा फिन-सॉलमध्ये काही लोकांना फक्त SIP/सिप मधून सुरुवात करण्यास सांगितली जाते, काहींना फक्त म्युच्युअल फंडमध्ये, तर काही लोकांना दोन्हीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.
उत्तर हे व्यक्तीनुरूप बदलते कारण, प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न वेगळे असते, जवाबदाऱ्या वेगळ्या असतात, वय वेगळे असते, या सर्व बाबींचा विचार करून मगच योग्यतो सल्ला देणे रास्त ठरते.
माझ्या मित्राने केले किंवा भावाने केले सुरु SIP/ सिप म्हणून मी पण केले असे करू नका.
तुमचे आर्थिक उद्दिष्ट काय आहे ते पहिले ठरवा आणि मग ते साध्य करण्यासाठी आम्हाला भेटा.
जर आर्थिक उद्दिष्ट ठरवण्यात अडचण येत असेल तर तुमचा महिन्याचा जमा-खर्च लिहून काढा आणि आम्हाला भेटा, आम्ही तुम्हाला मदत करू.
लक्षात घ्या, म्युच्युअल फंड आणि डायरेकट इक्विटी या दोन्हीमध्ये प्रचंड ताकत आहे जी योग्य मार्गदर्शनाखाली वापरून तुम्ही अतिशय श्रीमंत होऊ शकता.
पैसे वाचवणे सोडा (ते जुने झाले) आणि पैशाला कामाला लावा.
श्रद्धा फिन-सॉल
319, 2रा मजला,
शनिवार पेठ,
सुयोग मंगल कार्यालयाशेजारी,
पुणे 30
वेळ: 10 ते 6
फोन: 9822513801

Friday, 8 January 2016

पुणेकरांनो, फ्लॅट घेण्याचा विचार करताय ? वाचा आणि शेअर करा.


सगळे लोक पहिले फ्लॅट शोधतात, एखादा पसंत करतात नंतर मग होमलोन साठी प्रयत्न सुरु करतात.
पण तुम्ही थोडं उलट करा, आमच्याकडून होमलोन सॅन्कशन आधीच करून ठेवा म्हणजे तुम्हाला तुमचे खरे बजेट समजेल आणि त्यानंतर शोधमोहीम सुरु करा - तुमच्या मनासारखा फ्लॅट मिळवण्यासाठी. ज्यामुळे तुम्हाला नंतर धावपळ करावी लागणार नाही, तुमच्या बजेटप्रमाणे फ्लॅट शोधता आल्यामुळे वेळही वाचेल.
आणि सर्वात महत्वाचे : होमलोन आधीच सॅन्कशन केले म्हणजे लगेच घर घ्यायलाच हवे असे नाही, तुम्हाला पुरेसा वेळही मिळेल, अगदी 1 ते 2 वर्ष तुम्ही फ्लॅट शोधण्यासाठी घेऊ शकता !
आजच फोन करा : 9822513801
(सूचना: फक्त पुणे एरियासाठी मर्यादित, ग्रामपंचायत आणि गुंठेवारी क्षमस्व)