Tuesday, 29 March 2016

हेल्थ इज वेल्थ ? नक्की ?

हेल्थ इज वेल्थ म्हणत फक्त हेल्थकडे लक्ष देऊन चालत नाही, कारण वेल्थकडे दुर्लक्ष केले कि काही वर्षांनी टेन्शनमुळे हेल्थ देखील खराब होते.
जसं नियमित व्यायाम आणि चौरस आहार यामुळे शरीर काही वर्षांनी तंदुरुस्त होऊ शकतं, तसंच नियमित बचत आणि चौरस आर्थिक गुंतवणूक यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती काही वर्षांनी तंदुरुस्त होते.
मुद्दा हा आहे कि, जसे आपण आपले कुटुंब, नातेसंबंध, ऑफिसमधील किंवा व्यवसायामधील काम, शारीरिक स्वास्थ्य या मध्ये जातीने लक्ष घालतो आणि प्रत्येकामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करतो, त्याच प्रमाणे आपले आर्थिक गुंतवणुकीबद्दलचे ज्ञान वाढवणे आणि योग्य मार्गदर्शनाखाली चौरस गुंतवणूक करणे तितकेच महत्वाचे आहे.
श्रीमंत होण्यासाठी प्रत्येकजण धडपड करतो, परंतु हि धडपड फक्त मला आज पेक्षा उद्या आणि या महिन्यापेक्षा पुढल्या महिन्यात जास्त पैसा कसा मिळेल याच एका उद्दिष्टाने पछाडलेली असते. लोकांना यश मिळते देखील, उत्तरोत्तर मिळणारा पैसा वाढत जातो, पण हात-पाय हलायचे थांबले कि परिस्थिती बिकट होते. माणूस आपल्याच नातेवाईकांचा, मुलाबाळांचा, परिस्थितीचा गुलाम बनून जातो.
यावर मार्ग म्हणजे, आमच्या मागील लेखाप्रमाणे,
1. नियमित बचत (Regular Saving n Hedging)
2. आर्थिक व्यवस्थापन (Financial Planning) आणि गुंतवणूक (Investment) ज्यायोगे,
3. तुमचे निष्क्रीय उत्पन्न ( Passive Income) हे तुमच्या सक्रिय उत्पन्नाइतके (Active Income) करणे, हाच तुमचा आर्थिक स्वातंत्र्याचा (Financial Liberty) फॉर्म्युला आहे.
पटत असेल तर शेअर करा आणि वेळ काढून एकदा आमची भेट घ्या.
शिरीष कुलकर्णी
सी.ई. ओ.
श्रद्धा फिन-सॉल
कृष्ण लीला चेंबर,
2रा मजला, टिळक रोड,
एस.पी.कॉलेज समोर,
सदाशिव पेठ, पुणे 30
फोन: 9822513801

No comments:

Post a Comment