सध्या पुण्यामध्ये शेअरमार्केट संबंधित क्लासेसचा सुळसुळाट झालेला आहे, पाच दिवसाचा कोर्स करून रोज दोन-पाच हजार रुपये जर कमावता आले असते तर लोक पाच-पाच वर्षे अभ्यास करून, वाया घालवून, डॉक्टर किंवा इंजिनिअर का झाले असते ?
वॉरेन बफे नावाचा जगातील सर्वात श्रीमंत माणूस शेअर्समध्ये गुंतवणूक केली म्हणूनच इतका श्रीमंत झाला हे जरी खरे असले तरी, मित्रांनो तो काही असा पाच दिवसांचा शेअर ट्रेडिंगचा कोर्स करून श्रीमंत नाही झाला ! ! तर वॉरेन बफे यांनी संशोधन करून चांगल्या शेअर्समध्ये लांब पल्ल्याची गुंतवणूक केली म्हणून ते इतके श्रीमंत झाले, आणि लांब पल्ला म्हणजे किमान ५ ते १० वर्षे.
जसे एकाच औषधाचा सर्व रोगांवर किंवा सर्व पेशंटला समान गुण येत नाही, त्याच प्रमाणे तुमच्या आर्थिक गुंतवणूकीवर आकर्षक परतावा मिळण्यासाठी योग्यते मार्गदर्शन (औषध) मिळणे खूप महत्वाचे असते.
श्रद्धा फिन-सॉल या आमच्या कंपनीमध्ये आम्ही आमच्या क्लायंटना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन आणि सुयोग्य सल्ला देऊन श्रीमंत बनण्यास मदत करतो. महिना पाचशे रुपयांपासून ते पाच लाखांपर्यंत गुंतवणूक करणारे आणि रिक्षावाल्या काकांपासून ते यशस्वी उद्योजकांपर्यंत आमचे सर्वच प्रकारचे क्लायंट आहेत.
तुम्ही कधी येणार आहात भेटायला ??
No comments:
Post a Comment