साधारणतः सर्व बँकांकडून होम लोन या प्रकारासाठी जास्तीत जास्त 30 वर्षे परतफेडीचा कालावधी दिला जातो. जितका परतफेडीचा कालावधी जास्त, तितका EMI कमी होतो आणि त्यामुळे बहुतांशी सर्वजण 25 ते 30 वर्ष मुदतीकरता लोन घेतात. परंतु कमीतकमी कालावधीकरता लोन घेणे हेच चांगले आणि फायद्याचे असते. जास्त कालावधीकरता कर्ज / लोन घेतले तर व्याजापोटी खूपच जास्त पैसे भरावे लागतात. टक्क्यांमध्ये समजवायचे झाले तर, समजा 10 वर्ष मुदतीने लोन घेतले तर त्यावर मुद्दलाच्या 57% व्याजच भरावे लागते आणि समजा 20 वर्षे मुदतीने घेतले तर मुद्दलाच्या 128% व्याज पडते !
म्हणजे समजा तुम्ही 50 लाखांचे गृहकर्ज / होम लोन 25 वर्षांकरता घेतलेत तर तुम्ही मुद्दला व्यतिरीक्त 83.5 लाख रुपये (किंवा टक्क्यांमध्ये सांगायचे झाले तर 167%) फक्त व्याज भरता.
कधीकधी, जास्त मुदतीचे / कालावधीचे कर्ज / लोन घेणे गरजेचे असते कारण एखाद्या तरुण व्यक्तीस 10 वर्षांच्या मुदतीचा EMI (जो त्या वेळी खूपच जास्त वाटू शकतो) भरणे अशक्य असते पण मग अशा वेळेस आपला EMI आपण दरवर्षी किंवा दर 2-5 वर्षाने वाढवू शकतो जेणेकरून आपण लवकरात लवकर कर्ज मुक्त होऊ शकू आणि घराच्या किमतीइतके किंवा त्याहून जास्त रकमेचे व्याज वाचवू शकतो.
ग्रामपंचायत किंवा गुंठेवारी प्रॉपर्टी विकत घेतलेल्या लोकांना व्याजदर खूपच जास्त पडतो 11 ते 14 टक्के, अशा लोकांनी जर आपले गृहकर्ज / होम लोन दुसऱ्या बँकमध्ये ट्रान्सफर केले तर व्याजदर कमी मिळू शकतो ज्यामुळे काही लाख रुपयांची बचत होऊ शकते.
कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी / लोन साठी योग्य सल्ला आणि मार्गदर्शन मिळणे खूप महत्वाचे असते.
तुमची कागदपत्रे घेऊन आजच ऑफिसला भेट दया
श्रद्धा फिन-सॉल
मधु-विमल बिल्डिंग,
2रा मजला, शाहू कॉलेज रोड,
दत्तवाडी पोलीस स्टेशनशेजारी,
लक्ष्मीनगर, पुणे 09
फोन: 9503045951 / 9822513801
No comments:
Post a Comment