Tuesday, 29 March 2016

हेल्थ इज वेल्थ ? नक्की ?

हेल्थ इज वेल्थ म्हणत फक्त हेल्थकडे लक्ष देऊन चालत नाही, कारण वेल्थकडे दुर्लक्ष केले कि काही वर्षांनी टेन्शनमुळे हेल्थ देखील खराब होते.
जसं नियमित व्यायाम आणि चौरस आहार यामुळे शरीर काही वर्षांनी तंदुरुस्त होऊ शकतं, तसंच नियमित बचत आणि चौरस आर्थिक गुंतवणूक यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती काही वर्षांनी तंदुरुस्त होते.
मुद्दा हा आहे कि, जसे आपण आपले कुटुंब, नातेसंबंध, ऑफिसमधील किंवा व्यवसायामधील काम, शारीरिक स्वास्थ्य या मध्ये जातीने लक्ष घालतो आणि प्रत्येकामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करतो, त्याच प्रमाणे आपले आर्थिक गुंतवणुकीबद्दलचे ज्ञान वाढवणे आणि योग्य मार्गदर्शनाखाली चौरस गुंतवणूक करणे तितकेच महत्वाचे आहे.
श्रीमंत होण्यासाठी प्रत्येकजण धडपड करतो, परंतु हि धडपड फक्त मला आज पेक्षा उद्या आणि या महिन्यापेक्षा पुढल्या महिन्यात जास्त पैसा कसा मिळेल याच एका उद्दिष्टाने पछाडलेली असते. लोकांना यश मिळते देखील, उत्तरोत्तर मिळणारा पैसा वाढत जातो, पण हात-पाय हलायचे थांबले कि परिस्थिती बिकट होते. माणूस आपल्याच नातेवाईकांचा, मुलाबाळांचा, परिस्थितीचा गुलाम बनून जातो.
यावर मार्ग म्हणजे, आमच्या मागील लेखाप्रमाणे,
1. नियमित बचत (Regular Saving n Hedging)
2. आर्थिक व्यवस्थापन (Financial Planning) आणि गुंतवणूक (Investment) ज्यायोगे,
3. तुमचे निष्क्रीय उत्पन्न ( Passive Income) हे तुमच्या सक्रिय उत्पन्नाइतके (Active Income) करणे, हाच तुमचा आर्थिक स्वातंत्र्याचा (Financial Liberty) फॉर्म्युला आहे.
पटत असेल तर शेअर करा आणि वेळ काढून एकदा आमची भेट घ्या.
शिरीष कुलकर्णी
सी.ई. ओ.
श्रद्धा फिन-सॉल
कृष्ण लीला चेंबर,
2रा मजला, टिळक रोड,
एस.पी.कॉलेज समोर,
सदाशिव पेठ, पुणे 30
फोन: 9822513801

Monday, 29 February 2016

म्युचल फंड आणि tax benefit, वाचा आणि शेअर करा !

गुंतवणूकदारांना बऱ्याचदा असा प्रश्न पडतो कि आपण ज्या म्युचल फंडमध्ये गुंतवणूक केली आहे त्याचा फायदा सेक्शन 80C अंतर्गत आपल्याला नक्की मिळेल ना ? तर हा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे कारण बहुतांशी लोक फक्त tax benefit मिळावा या उद्देशानेच म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करतांना दिसतात. परंतु फक्त काही प्रकारच्या म्युचल फंडमध्ये केलेली गुंतवणूकच तुम्हाला 80C अंतर्गत करसवलत देऊ शकते आणि आपण निवडलेला म्युचल फंड जर नेमका त्या प्रकारामध्ये मोडत नसेल तर आपणाला 80C चा कोणताही फायदा मिळू शकणार नाही. 

त्यामुळे म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वीच आपण सर्व माहिती व्यवस्थित घेणे अतिशय महत्वाचे असते. तसेच कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणुकीचा एक आराखडा तयार असणे गरजेचे असते. एकदा गुंतवणूक केली कि नंतर त्यास सुधारणे अतिशय अवघड आणि नुकसानदायक ठरू शकते.
तर आपण पाहूया असे फंड्स ज्यात tax benefit मिळू शकते;
Equity Linked Savings Scheme: इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम  प्रकारच्या फंड मध्ये जास्तीत जास्त एक लाख रुपयांची गुंतवणूक सेक्शन 80C अंतर्गत मोडते. आपण जर सिप किंवा SIP द्वारे गुंतवणूक करीत असाल तरी ते चालू शकते. साधारणतः ELSS मध्ये तुम्हाला कमीतकमी तीन वर्षे तुमची गुंतवणूक ठेवावीच लागते, म्हणजेच काढता येत नाही परंतु हा कालावधी तसा PPF किंवा NSC पेक्षा बराच कमी आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. 
इतर सर्व स्कीम / फंड प्रमाणेच या प्रकारच्या फंड मध्ये देखील डिव्हीडन्ट आणि ग्रोथ असे दोन्ही पर्याय  उपलब्ध आहेत. 
Rajiv  Gandhi Equity Savings Scheme (RGESS) तसेच काही Pension Plan (निवृत्ती योजना ) देखील करसवलत देऊ शकतात.
फक्त tax benefit साठी कोणतीही गुंतवणूक करू नका, तर तुमचा पैसा महागाईच्या भविष्यातील दरापेक्षा जास्त पटीने कसा वाढेल याचा देखील विचार केला गेला पाहिजे, त्याच सोबत फक्त म्युचल फंड किंवा फक्त जमीन किंवा फक्त सोने अशी एकाच प्रकारची गुंतवणूक करणे टाळून, सर्व प्रकारांमध्ये योग्य मार्गदर्शनाखाली केलेली गुंतवणूक तुम्हाला खात्रीशीर श्रीमंत बनवू शकते. 
बरेचसे मोठे / धनाढ्य गुंतवणूकदारदेखील त्यांच्या इतर गुंतवणुकिंसोबतच म्युचल फंडमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात ज्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांचा पोर्टफ़ोलिओ परीपूर्ण बनतो.
तर आजच आम्हाला भेटण्यासाठी आमची वेळ घ्या
शिरीष कुलकर्णी 
श्रद्धा फिन-सॉल 
कृष्ण लिला चेम्बर्स, 
2रा मजला, टिळक रोड,
स.प. महाविद्यालयासमोर, पुणे 30
फोन : 9822513801

Saturday, 30 January 2016

अजून किती वर्षे तुम्ही नोकरी किंवा व्यवसायामधून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून जगणार आहात?

तुमचे सक्रीय उत्पन्न ( Active Income) आणि निष्क्रीय उत्पन्न ( Passive Income) समान आहे का ?
सक्रिय उत्पन्न: तुमचे मासिक उत्पन्न.
उदा. नोकरी, व्यवसाय या मधून मिळणारा पैसा.
निष्क्रीय उत्पन्न: कोणतेही काम / व्यवसाय न करता मिळणारे उत्पन्न.
उदा. फिक्स्ड डिपॉझिटचे व्याज किंवा अन्य कोणत्याही गुंतवणुकीवर मिळणारा परतावा, फ्लॅट किंवा दुकानाचे भाडे वैगरे.
बहुदा हे वाचतांना तुम्ही थोडेतरी अंतर्मुख झाले असाल. एक वेळ अशी आली पाहिजे कि तुम्ही काहीही काम (उत्पन्नासाठी/ उपजिवीकेसाठी) केले नाही तरी तुम्ही आत्ता ज्या लाईफ स्टाईलने जगत आहात तसेच कायम राहू शकाल.
जर तुम्हाला वाटत असेल कि आम्ही हे कोण्या इन्शुरन्स बद्दल सांगत असू तर तसे नाहीये.
आम्ही तुमचे संपूर्ण आर्थिक व्यवस्थापन अशा पद्धतीने करू शकतो कि ज्यामुळे तुम्हाला तुमच्या नोकरी किंवा व्यवसायावरती अवलंबून राहावे लागणार नाही, तुमचे निष्क्रीय उत्पन्न (Passive Income) हे तुमच्या भविष्यातील सक्रीय (Active Income) मासिक उत्पन्ना इतके करायचे असेल तर आम्हाला भेटा.
शिरीष कुलकर्णी
श्रद्धा फिन-सॉल
319, 2रा मजला,
शनिवार पेठ,
सुयोग मंगल कार्यालयाशेजारी,
पुणे 30
फोन: 9822513801
(भेट फक्त पूर्वनियोजित वेळेप्रमाणेच)