Saturday, 13 December 2014

Great News ! Health Insurance for Senior Citizens ! Amazing Advantages !

The only health insurance policy for senior citizens that covers all pre-existing diseases from first year onwards ! No pre-policy medical check-up required ! lowest premium ! policy from government insurance company yet with all benefits of Group Mediclaim / Corporate Health Insurance. 

Thursday, 4 December 2014

Cashless Stopped in Pune / पुण्यात क्याशलेस सेवा बंद

पुण्यातील रुग्णालयांमधील क्याशलेस सेवा बंद ?!
सध्या तुम्ही रोज वर्तमानपत्रामध्ये या रिलेटेड बातम्या वाचतच असाल. पण मग म्हणजे नक्की झालं काय आहे ते समजल आहे ना ?

 मी सांगतो जे मला उमगलंय, ज्या चार निम्न-सरकारी (P.S.U.) इंश्युरन्स कंपन्या आहेत (National, New India, Oriental आणि United India) त्यांनी एकत्र येउन एक संघटना केली ज्याला नाव दिले GIPSA. आता या संघटनेने भारताच्या प्रत्येक प्रमुख शहरात PPN नावाची योजना राबवली. आता हि PPN योजना म्हणजे नक्की काय तर, GIPSA ने ठरवले कि शहरातील काही ठराविकच हॉस्पिटल मध्ये क्याशलेस सेवा चालू ठेवायची आणि बाकी सर्व हॉस्पिटल मध्ये क्याशलेस सेवा बंद करायची. याचा फायदा GIPSA म्हणजेच इंश्युरन्स कंपन्यांना असा होणार आहे कि त्यांचा उपचारांवरचा खर्च कमी होणार आहे, कारण ते या मार्गे सर्व हॉस्पिटल्सला कोंडी मध्ये पकडून कमी दरांमध्ये उपचार देण्यास भाग पाडणार आहेत.
पण मग अनेक प्रश्न उपस्थित होतात जस कि;
1. उपचारांचे दर कमी झाले तरी प्रिमियम काही कमी होत नाहीये. सामान्य माणसाला त्याचा काहीच फायदा दिला जात नाहीये असं दिसतंय.
2. काय सरकारी कंपन्या असा अचानक निर्णय घेऊ शकतात ? ज्याचा सामान्य माणसाला त्रास होऊ शकेल ?
3. मेडिक्लेम घेतांना माणूस हे बघतो कि आपल्या घराजवळच किंवा विश्वासाचं हॉस्पिटल त्या इंश्युरन्स कंपनीच्या यादीमध्ये आहे ना ! आणि आता जर ते वगळल गेलं असेल तर ?
4. अजून एक जळजळीत प्रश्न, कि कॉर्पोरेट पॉलीसी असणाऱ्यांना असे निर्बंध नाहीत ! हे सर्व निर्बंध फ़क्त स्वतः पॉलीसी विकत घेणाऱ्या लोकांसाठीच आहेत !! तर असा भेदभाव का ?
5. बर, हॉस्पिटल्सला कमी दरामध्ये तेच ऑप्रेशन करायला भाग पाडल्यामुळे मिळणाऱ्या सेवा-सुविधा किंवा वापरलं जाणार मटेरियल जर हलक्या दर्ज्याच वापरावं लागलं तर ? ती चूक कोणाची ? आपण नेहमी ज्यांना हक्काने कोसतो त्या हॉस्पिटल्सची ?


खरतर प्रत्येकाची या घटनेवरती आपली एक प्रतिक्रिया आहे.
उपाय आणि पर्याय अनेक आहेत यावर माझ्याकडे … पण तुम्हाला काय वाटत ?

Tuesday, 2 December 2014

Health Insurance - Importance of After-Sales-Service / हेल्थ इन्शुरन्स - विक्रीपश्चात सेवेचे महत्व

विचार करा, आपण आपली पहिली गाडी / मोबाईल / टि. व्ही. विकत घेतांना त्या वस्तूच्या फिचर सोबत त्याचे सुटे पार्ट किती महाग आहेत तसेच त्याचे सर्विस स्टेशन किती आहेत आणि ते घराजवळ आहेत का, या आणि अशा कितीतरी बाबींचा  विचार करतो.

पण इतका विचार आपण हेल्थ इन्शुरन्स विकत घेतांना का नाही करत ? तेंव्हा आपण फक्त प्रिमियम कोणत्या कंपनीचा सर्वात स्वस्त आहे, त्याचाच विचार करतो. एखाद्याच्या मृत्यूपश्चात, त्या व्यक्तीच्या उपचारांच्या खर्चाचे कर्ज पुढील काही वर्ष त्याच्या नातेवाईकांना भरतांना पाहिलंय कधी ?

लक्षात घ्या, आज हेल्थ इन्शुरन्स विकत घेण खूप सोप्प आहे परंतु एकदा विकल्यानंतर योग्यती माहिती व सेवा देण तितकच महत्वाचं ! आणि ती माहिती जसं कि, कोणते आजार कव्हर होतील आणि कोणते नाही, कोणते रुग्णालय कशासाठी जास्त चांगलं आहे, क्लेम कधी-कसा-केव्हा करावा, रुग्णालयात कशाचे पैसे भरावे - कशाचे नाही वै. फक्त एक असाच माणूस सांगू शकतो ज्या व्यक्तीने स्वतः काही वर्ष रुग्णालयात आणि टि.पी.ए कंपनीमध्ये काम केलं आहे. 

सल्ला: हेल्थ इन्शुरन्स विकत घेतांना, इन्शुरन्स कंपनी सोबत तुमचा इन्शुरन्स एजंटदेखील तितकाच चांगला असायला हवा !
अधिक माहितीसाठी फोन करा 9822513801