Showing posts with label insurance. Show all posts
Showing posts with label insurance. Show all posts

Friday, 4 December 2015

आर्थिक अडचण किंवा गुंतवणुकीबद्दल सल्ला - मोफत !


>तुमच्या सध्याच्या आर्थिक गुंतवणुकीबद्दलचे प्रश्न सोडवू
>आर्थिक अडचणीवर उपाय सांगू 
>कर्जामधून बाहेर पडण्याबद्दल मार्गदर्शन करू
>नक्की कुठे आणि कशी गुंतवणूक करावी या बद्दल मार्गदर्शन करू
तुमचे आर्थिक प्रश्न आणि शंका काहीही असोत, त्याबद्दल योग्य ते मार्गदर्शन केले जाईल आणि तेही कोणतीही फी न घेता, फक्त सोमवार ते शनिवार संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत.
श्रद्धा फिन-सॉल
319, 2रा मजला,
शनिवार पेठ,
सुयोग मंगल कार्यालयाशेजारी,
पुणे 30
फोन: 9822513801

Friday, 27 November 2015

ज्येष्ठ नागरीक आणि मेडिक्लेम

आमचे क्लायंट प्रदीपराव, अतिशय तरुण हृदयाचे आणि सर्वांशी हसतखेळत संवाद साधणारे व्यक्तिमत्व. त्यांच्या आवडीच्या शेअर्सचा कसून अभ्यास असायचा त्यांचा, त्यामुळे बऱ्याचदा आम्हीदेखील त्यांना आमच्या सेमिनारमध्ये मार्गदर्शन करण्यास सांगायचो. पुण्यातील एका नामवंत प्रायव्हेट कंपनीमधून तीन वर्षांपूर्वी रिटायर झाले होते. एकच मुलगी तीही फ्रान्स मध्ये लग्न होऊन गेलेली. उशिरा झाली होती म्हणून लहानपणापासूनच लाडात वाढलेली, लग्नही मोठया थाटात लावले होते. प्रदीपरावांचे कुटुंब सौ. प्रतीक्षाताई यांनी इतके वर्ष घराची बाजू खंबीरपणे सांभाळलेली. गेल्यावर्षीच फ्रान्सला जाऊन आले होते दोघे, दहा दिवस, नव्याने आयुष्य जगलेले. काकांना व्यायामाची खूप आवड, साधे आणि घरचे जेवण, सकाळचे चालणे आणि संध्याकाळी जिम असा दिनक्रम असल्यामुळे त्यांचा चालण्याचा वेग आणि कामाचा आवाका एखाद्या तरुणाला लाजवेल इतका होता. 

साधारण दोनएक महिन्यांपूर्वी नेहमीप्रमाणे पहाटे ५.३०ला  चालायला बाहेर पडले होते, खिशात पॉकेट रेडिओवर गाणी चालू होती आणि नीलायमच्या चौकात रस्ता क्रॉस करतांना अचानक एक इंडिका गाडी त्यांना धक्का देऊन गेली. नंतर कोणीतरी सांगितले कि कुण्या मोठ्या आय. टी. कंपनीची गाडी होती. इतक्या वर्षांचा दिनक्रम असल्यामुळे वाटेत भेटणारी नेहमीची लोक खूप होती. त्यातीलच कुण्याएका सदगृहस्थाला ओळख पटली आणि त्याने जवळच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेउन दाखल केले. ताईनां फोन झाला, त्याही तशाच तडक हॉस्पिटलमध्ये आल्या. सर्व तपासण्या झाल्या परंतु निदान काही होत नव्हते. शेवट डॉक्टरांनी मेंदूचा MRI करायचे ठरवले आणि समजले कि मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झाला आहे. डॉक्टरांनी प्रतीक्षाताईना लगेच ICU मध्ये बोलावले आणि सांगितले कि ताबडतोब ऑपरेशनला घ्यावे लागेल, खर्च किमान ३ ते ४ लाख होईल, लवकर पैसे भरा म्हणजे आम्हाला ऑपरेशनची तयारी सुरु करता येईल. संध्याकाळ झाली होती आणि आत्तापर्यंत एक लाख रुपये भरून झाले होते, ताईंनी काही तक्रार केली नाही, डॉक्टरांना सांगितले कि तुम्ही तयारी करा मी पैसे भरते आहे अर्ध्यातासात. रिक्षा केली, हातामधील बांगड्या आणि कानातले मोडून पैसे घेऊन आल्या सुद्धा. 

पुढे आठवडाभराने काका शुद्धीवर आले, परंतु कंबरे खालचा भाग अजूनही बधीरच होता, त्यांची मुलगी आणि जावई दोघेही आले होते पण काका अजूनही कोणास नीट ओळखत नव्हते. महिनाभर हॉस्पिटलमध्ये काढल्यानंतर गेल्या महिन्यात त्यांना घरी सोडले, पण डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे आता पुढील आयुष्य व्हीलचेअर वरच काढावे लागणार होते. मागच्याच आठवड्यामध्ये त्यांच्या पोर्टफोलिओ बद्दल चर्चा करण्यास गेलो होतो, म्हणाले कुलकर्णी तुमचा सल्ला ऐकला असता तर किमान पाच लाख रुपये वाचले असते आणि खरे तर त्याहून महत्वाचे म्हणजे माझ्या बायकोचे दागिने वाचले असते, इतका फिट मी, कधी शुगरचा त्रास नाही कि मोठे आजारपण नाही पण वेळेपुढे कुणाचे काही चालत नाही हेच खरे. मिश्किलपणे म्हणाले, साठी क्रॉस झालेली आणि त्यात हे दुखणे मागे लागलेले आता कोण देणार मला मेडिक्लेम नाही का ? मी म्हणालो, काका मग मी कशासाठी आहे ? तुम्हाला आत्ता देखील मिळू शकतो मेडिक्लेम आणि तेही तुमच्या आधीच्या सर्व आजारांसहित तुम्हाला आणि काकूंना कव्हर करेल अस्सा. 

मित्रांनो, असे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात येत असतात किंवा सभोवताली घडत असतात. मोठ्या कष्टाने आयुष्यभर कष्ट करून पैसे साठवायचे, कशासाठी कि म्हातारपणी कुणाची मेहेरबानी नको, पण एक आजारपण तुमचे सर्व सेव्हिंग संपवते आणि पदरी येते ते नको असलेले परावलंबत्व. त्यासाठी आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच कंपन्यांमध्ये कामगारांसाठी  चर्चासत्रे आयोजित करतो जेणेकरून त्यांना त्यांचे रिटायरमेंटच्या वेळी मिळालेले पैसे वाचवता येतील, विषय एकच असतो "हॉस्पीटलवरचा अनाठायी खर्च कसा वाचवावा" ज्यामध्ये आम्ही अनेक प्रकारचे पर्याय सुचवितो. बऱ्याचदा जर योग्य नियोजन केले तर तुमच्या साठवलेल्या पैश्यांच्या व्याजावरच मेडिक्लेमचे प्रिमियम भागू शकतात. 

 काही महत्वाचे मुद्दे;
 १. ज्यांचे वय ७०च्या पुढे गेले आहे त्यांनी आहे तोच मेडिक्लेम चालु ठेवा. नसेल तरी ८० वयापर्यंत मिळू शकतो. 
२. आधीचे काही आजार असतील तर ते कव्हर होतील असे देखील पर्याय उपलब्ध आहेत, थोडी माहिती काढा. 
३. ज्यांचे वय ७० च्या आत आहे, ते आपल्याला मिळणारे फायदे पुन्हा एकदा तपासून घ्या किंवा सरळ दुसरा चांगला प्रायवेट मेडिक्लेम घ्या. 
४. हेल्थ इंश्युरन्स माणशी किमान ३ लाखाचा असावा,  ५ ते १० लाख आयडियल. 
५. तुम्हाला तुमच्या नोकरीच्या ठिकाणी जरी हेल्थ इन्शुरन्स मिळाला असेल तरी एक अजून पॉलिसी असणे कधीही चांगले.  
६. घरातील ज्येष्ठ नागरीक सर्वात पहिले कव्हर करा. 
७. कमी प्रिमियम म्हणजे कमी फायदे - काही अपवाद वगळता. 
८. फ्लोटर पौलीसी कुटुंबासाठी सर्वोत्तम. 
९. तुमचे आई-वडील, तुम्ही-तुमची पत्नी आणि तुमची मुले असे सर्वजण एकाच मेडीक्लेम मध्ये कव्हर करू शकतो ज्यामुळे प्रिमियम कमी पण फायदे जास्त मिळतात.
१०. काही पर्याय असे देखील मिळू शकतात ज्यामध्ये तुमचे वय कितीही असले तरी पॉलिसी घेण्यापूर्वी तुमची आरोग्य तपासणी करावी लागत नाही. 
११. अतिशय गरीब कुटुंबासाठी पुणे महानगरपालिकेचे काही उपक्रम आहेत, त्याचा लाभ घ्या. किंवा राजीव गांधी आरोग्यदायी योजनेचा लाभ घ्या. 

असे खूप पर्याय आज उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुमचे पूर्विचे सर्व आजार पहिल्या दिवसापासून कव्हर केले जाऊ शकतात आणि तेही कोणत्याही आरोग्य तपासण्या न करता. जरी तुमचे वय ८० झाले असेल तरीही. होय, त्यामुळे आजच आपल्या आरोग्य विमा सल्लागाराला भेटा आणि शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानाने आत्मनिर्भर जगा.

Thursday, 1 October 2015

Performance comparison of various asset classes- Sensex (Equity), Fixed Deposit (Debt), Gold and Silver

Performance comparison of various asset classes- Sensex (Equity), Fixed Deposit (Debt), Gold and Silver and the impact of inflation on them beginning from the financial year 1979-80.
Why 1979-80?
That is the year from which Sensex came into existence with base as 100.
1) Assume you’ve invested Rs.1 lakh each in FD, gold, silver and Sensex 35 years ago. As of 31’st March 2013 the value is as follows:
FD- Rs.16.94 lakhs, Gold- Rs.36.51 lakhs, Silver- Rs.28.39 lakhs and Sensex- Rs.2.23 crores
2) Unlike other assets mentioned above, Sensex has dividend yield in addition to capital growth.
Assuming a dividend yield (duly reinvested) of 2% on an average, the Sensex returns work out to Rs.4.05 crores
3) In terms of percentage, the 35 years return (as given above) is as follows: FD-8.41%, Gold- 10.82%, Silver- 10.03% and Sensex- 16.72% (18.72% if dividend yield is as assumed above)
4) When we talk about returns, we’ve to talk about inflation too.
The average annualized inflation for the above period is 7.57%.
5) If Rs.1 lakh has been kept under the mattress instead of being invested, it’s value has come down to mere Rupees six thousand (i.e.)purchasing power of rupee reduced by whopping 94% over 35 year period.
6) What we should look for is real returns (i.e.) returns after inflation and taxes. Since tax differs from each asset class and income category, we’ve taken only inflation. Inflation is common for all
7) After adjusting for inflation, the asset classes have grown by following annualized rate in real terms.
FD- 0.84%, Gold-3.25%, Silver-2.46% and
Sensex- 9.15% (around 11% including dividend yield). These numbers matter a lot.
This is what our wealth would have grown after adjusting for inflation. Since we know the tax details for each asset class and for our income, we can work out the return after taxes too.
FD would automatically turn negative. Gold and Silver would have provided a negligible return. Only equity would have provided a real rate of return of above 7%.
8) In the long run, the best we can aim and get even in asset classes like equity and real estate is real return of around 4%+. Growing money is that difficult. More important is not losing the money.
9) Gold’s real rate of return of 3.25% is made possible due to rupee significantly depreciating between 1980s to early last decade. Otherwise we might have got even a negative return. We’ll explain this by example.
Assume the rupee dollar conversion rate is 1 USD = Rs.60.
For illustration purposes, let us assume the price of 1 gram of gold is 1 USD. With the above conversion rate, the value of 1 gm of gold is Rs.60. Imagine a scenario when rupee depreciates by 100% (i.e.) 1 USD = Rs.120/- The gold price remains the same at 1 USD. The value of our gold would increase by 100% to Rs.120/- though the price has not changed in the international markets and being the net importer of gold.
10) Please use FD for contingency or emergency funds.
Let gold be part of social requirement and not exceed 10% of investment portfolio.
Silver is again part of only social or cultural needs.
Equity is for building wealth. We believe real estate also can build wealth but it was the ideal option till 2006.
In nutshell: Proper Diversification, Disciplined and Scientific Financial Planning can result Instrumental Wealth.
Shirish Kulkarni
CEO
Shraddha FinSol

Monday, 28 September 2015

आर्थिक गुंतवणुक, सहा अंधळे आणि हत्ती

मित्रांनो, सहा अंधळे आणि हत्तीची गोष्ट आपल्या सर्वाना माहितच आहे. की एकदा सहा अंधळे, हत्ती नेमका कसा असतो हे समजण्यासाठी प्राणी संग्रहालयात जातात, प्रत्येक जण तेथील हत्तीच्या निरनिराळया अवयवांना स्पर्श करून पुन्हा एकत्र भेटतात.

आपले अनुभव सांगतांना, जो पायाला स्पर्श करतो तो म्हणतो हत्ती खांबासारखा आहे, जो कानाला स्पर्श करतो तो म्हणतो हत्ती सुपासारखा आहे, जो शेपटीला स्पर्श करतो तो म्हणतो हत्ती दोरखंडासारखा आहे, इ.

या कथेतील हत्ती म्हणजे तुमची आर्थिक गुंतवणूक (फायनांशियल प्लानिंग ) समजा आणि तुम्हाला सल्ला देणारी व्यक्ती जर फ़क्त इन्शुरन्स किंवा रिअल इस्टेट किंवा SIP किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करणेच हिताचे आहे असे सांगत असेल तर आज ही कथा वाचल्यानंतर आपण ओळखु शकाल असे सल्लागार (अंधळे).

तुमचे फायनांशियल प्लानिंग आमच्याकड़े सोपवा आणि शास्त्रोक्त तसेच एकाच छता खाली उपलब्ध असलेल्या आणि आम्ही सुचवलेल्या विविध आर्थिक गुंतवणुकीच्या पर्यायांचा फायदा करून घ्या.

लक्षात ठेवा, योग्य व्यक्तीकडून मिळालेला योग्यवेळचा - योग्य सल्ला आणि दूरदृष्टी या त्रिसूत्रीमध्ये  आर्थिक यशाचे रहस्य दडलेले आहे.

फोन करा आणि प्रत्यक्ष भेटा;
शिरीष कुलकर्णी
फाउंडर आणि सी.ई.ओ.
श्रद्धा फिन-सॉल
पुणे.
मोबाईल : 9822513801
वेबसाईट: www.shraddhafinsol.com
फेसबुक पेज : www.facebook.com/shraddhafinsol

Wednesday, 14 January 2015

Less Known Facts : Benefits of sticking to one Insurer Company


i) If you are suffering from any pre-existing #disease at the time of commencement of the mediclaim policy then complications of that disease will be covered only after 3 or 4 years of the commencement date.

ii) If you stick to your mediclaim policy for more than one year or so, company may offer you bonus or give discount in premium.

iii) After two years of mediclaim #insurance commencement, you may get free health check-ups for every second year. Or you may get health services and product of market value up to 10% of your last paid premium.

#Mediclaim is one of the risk management tools. If you are not covered with mediclaim, your wealth may erode just like that if there is a hospitalization. By taking a mediclaim policy you are actually protecting your wealth. Call : 9822513801

Thursday, 8 January 2015

Health Insurance Myths & Facts / हेल्थ इंशुरंस समज आणि गैरसमज - 8

Myth: Once bought, the Health Insurance terms remain the same.

#Health Insurance is a contract that is renewed every year between the insurer and the insured. Like every contract the terms can change at the time of renewal. You better be sure to keep checking any update emails or letter you may have received from your insurer at the time of making the premium payments to avoid any surprises later on.
For any assistance: #9822513801