Monday, 7 December 2015

ब्रेकिंग न्यूज ….


दुबई, लंडन, कॅलिफोर्निया, शिकागो, ऑन्टारियो-कँनडा येथे घरे व जमीन पुण्या-मुंबई पेक्षा स्वस्त ….
शिरवळ,वाई,सातारा, कोल्हापूर, मणिपाल-कर्नाटक, मुंबई-गोवा हायवे, रायगड, खोपोली, सोलापूर, सिल्व्हासा ,वापी,इत्यादी भागात शोधून-शोधून जमीन व घरे घेणाऱ्या उत्साही पुणेकर गुंतवणूकदरांसाठी गुंतवणुकीची सुवर्णसंधी….
जा आणि रिकाम्या जागा घेऊन तिथले जागेचे भाव पण वाढवून या ….

Friday, 4 December 2015

आर्थिक अडचण किंवा गुंतवणुकीबद्दल सल्ला - मोफत !


>तुमच्या सध्याच्या आर्थिक गुंतवणुकीबद्दलचे प्रश्न सोडवू
>आर्थिक अडचणीवर उपाय सांगू 
>कर्जामधून बाहेर पडण्याबद्दल मार्गदर्शन करू
>नक्की कुठे आणि कशी गुंतवणूक करावी या बद्दल मार्गदर्शन करू
तुमचे आर्थिक प्रश्न आणि शंका काहीही असोत, त्याबद्दल योग्य ते मार्गदर्शन केले जाईल आणि तेही कोणतीही फी न घेता, फक्त सोमवार ते शनिवार संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत.
श्रद्धा फिन-सॉल
319, 2रा मजला,
शनिवार पेठ,
सुयोग मंगल कार्यालयाशेजारी,
पुणे 30
फोन: 9822513801

Sunday, 29 November 2015

स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करताय ? हेल्थ इन्शुरन्स / मेडीक्लेम सल्लागार बना आणि अधिक उत्पन्न कमवा !

सविस्तर माहितीसाठी आमची संपूर्ण पोस्ट वाचा, 
फायदे;
1. तुम्हाला मार्केटिंग करण्याची गरज नाही, तुमचे मार्केटिंग आमची कंपनी करेल
2. काही इन्व्हेस्टमेंट / भांडवल नाही
3. कोणतीही परीक्षा नाही
4. तुमच्या सवडीप्रमाणे काम करा
5. कोणतेही टार्गेट नाही
प्रश्न: काय हे MLM आहे ?
उत्तर: नाही, सदर व्यवसायाची संधी म्हणजे MLM नाही किंवा त्याप्रकारची कोणतीही स्कीम वैगरे नाही. 
प्रश्न: मग नक्की काम / व्यवसाय काय आहे ?
उत्तर: सरकारी इन्सुरन्स कंपनीचा मेडिक्लेम / हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी विकण्याचे काम करायचे आहे, ज्यासाठी आमची कंपनी तुम्हाला मार्केटिंग करण्यास मार्गदर्शन करेल तसेच काहीप्रमाणात तुमचे मार्केटिंग करण्यास मदतही करेल ज्यामुळे तुमचा नवीन व्यवसाय चांगला चालेल. 
प्रश्न: मी सध्या नोकरी करतो तर माझ्या नावावर एजन्सी कशी घेणार ?
उत्तर: तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावावर किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर सदर एजन्सी घेऊ शकता आणि काम सुरु करू शकता. जे लोक मेडिकल रिप्रेजेण्टेटिव्ह, हॉस्पिटल किंवा क्लिनिकमध्ये काम करत आहेत किंवा सध्या LIC किंवा इतर कोणताही इन्शुरन्स विकत आहेत त्या लोकांसाठी तर हे अजूनच सोप्पे काम आहे.
प्रश्न: मी सध्या कॉलेजमध्ये आहे / शिक्षण घेत आहे / गृहिणी आहे, मी करू शकतो / शकते का ?
उत्तर: हो, नक्कीच !
प्रश्न: मी पुण्याबाहेर राहतो, काय करावे ?
उत्तर: आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही राहात असाल तरी फक्त एकदा आमच्या ऑफिसला भेट दयावी लागेल त्यानंतर आपण व्यवसाय सुरु करू शकता. 
प्रश्न: किती ट्रेनिंग लागेल, कसे सुरु करावे ?
उत्तर: दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा, प्रत्यक्ष भेटण्यास या म्हणजे साधारण एका तासामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि तुम्ही व्यवसाय सुरु करू शकाल. 
ऑफिसचा पत्ता;
श्रद्धा फिन-सॉल
319, 2रा मजला
शनिवार पेठ
सुयोग मंगल कार्यालयापाशी
पुणे 30
फोन: 9822513801
सूचना: ज्यांना इच्छा असेल त्यांनी वेळ घेऊन प्रत्यक्ष भेटावे, इथे आपले मोबाईल क्रमांक देऊ नये. 

Friday, 27 November 2015

ज्येष्ठ नागरीक आणि मेडिक्लेम

आमचे क्लायंट प्रदीपराव, अतिशय तरुण हृदयाचे आणि सर्वांशी हसतखेळत संवाद साधणारे व्यक्तिमत्व. त्यांच्या आवडीच्या शेअर्सचा कसून अभ्यास असायचा त्यांचा, त्यामुळे बऱ्याचदा आम्हीदेखील त्यांना आमच्या सेमिनारमध्ये मार्गदर्शन करण्यास सांगायचो. पुण्यातील एका नामवंत प्रायव्हेट कंपनीमधून तीन वर्षांपूर्वी रिटायर झाले होते. एकच मुलगी तीही फ्रान्स मध्ये लग्न होऊन गेलेली. उशिरा झाली होती म्हणून लहानपणापासूनच लाडात वाढलेली, लग्नही मोठया थाटात लावले होते. प्रदीपरावांचे कुटुंब सौ. प्रतीक्षाताई यांनी इतके वर्ष घराची बाजू खंबीरपणे सांभाळलेली. गेल्यावर्षीच फ्रान्सला जाऊन आले होते दोघे, दहा दिवस, नव्याने आयुष्य जगलेले. काकांना व्यायामाची खूप आवड, साधे आणि घरचे जेवण, सकाळचे चालणे आणि संध्याकाळी जिम असा दिनक्रम असल्यामुळे त्यांचा चालण्याचा वेग आणि कामाचा आवाका एखाद्या तरुणाला लाजवेल इतका होता. 

साधारण दोनएक महिन्यांपूर्वी नेहमीप्रमाणे पहाटे ५.३०ला  चालायला बाहेर पडले होते, खिशात पॉकेट रेडिओवर गाणी चालू होती आणि नीलायमच्या चौकात रस्ता क्रॉस करतांना अचानक एक इंडिका गाडी त्यांना धक्का देऊन गेली. नंतर कोणीतरी सांगितले कि कुण्या मोठ्या आय. टी. कंपनीची गाडी होती. इतक्या वर्षांचा दिनक्रम असल्यामुळे वाटेत भेटणारी नेहमीची लोक खूप होती. त्यातीलच कुण्याएका सदगृहस्थाला ओळख पटली आणि त्याने जवळच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेउन दाखल केले. ताईनां फोन झाला, त्याही तशाच तडक हॉस्पिटलमध्ये आल्या. सर्व तपासण्या झाल्या परंतु निदान काही होत नव्हते. शेवट डॉक्टरांनी मेंदूचा MRI करायचे ठरवले आणि समजले कि मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झाला आहे. डॉक्टरांनी प्रतीक्षाताईना लगेच ICU मध्ये बोलावले आणि सांगितले कि ताबडतोब ऑपरेशनला घ्यावे लागेल, खर्च किमान ३ ते ४ लाख होईल, लवकर पैसे भरा म्हणजे आम्हाला ऑपरेशनची तयारी सुरु करता येईल. संध्याकाळ झाली होती आणि आत्तापर्यंत एक लाख रुपये भरून झाले होते, ताईंनी काही तक्रार केली नाही, डॉक्टरांना सांगितले कि तुम्ही तयारी करा मी पैसे भरते आहे अर्ध्यातासात. रिक्षा केली, हातामधील बांगड्या आणि कानातले मोडून पैसे घेऊन आल्या सुद्धा. 

पुढे आठवडाभराने काका शुद्धीवर आले, परंतु कंबरे खालचा भाग अजूनही बधीरच होता, त्यांची मुलगी आणि जावई दोघेही आले होते पण काका अजूनही कोणास नीट ओळखत नव्हते. महिनाभर हॉस्पिटलमध्ये काढल्यानंतर गेल्या महिन्यात त्यांना घरी सोडले, पण डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे आता पुढील आयुष्य व्हीलचेअर वरच काढावे लागणार होते. मागच्याच आठवड्यामध्ये त्यांच्या पोर्टफोलिओ बद्दल चर्चा करण्यास गेलो होतो, म्हणाले कुलकर्णी तुमचा सल्ला ऐकला असता तर किमान पाच लाख रुपये वाचले असते आणि खरे तर त्याहून महत्वाचे म्हणजे माझ्या बायकोचे दागिने वाचले असते, इतका फिट मी, कधी शुगरचा त्रास नाही कि मोठे आजारपण नाही पण वेळेपुढे कुणाचे काही चालत नाही हेच खरे. मिश्किलपणे म्हणाले, साठी क्रॉस झालेली आणि त्यात हे दुखणे मागे लागलेले आता कोण देणार मला मेडिक्लेम नाही का ? मी म्हणालो, काका मग मी कशासाठी आहे ? तुम्हाला आत्ता देखील मिळू शकतो मेडिक्लेम आणि तेही तुमच्या आधीच्या सर्व आजारांसहित तुम्हाला आणि काकूंना कव्हर करेल अस्सा. 

मित्रांनो, असे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात येत असतात किंवा सभोवताली घडत असतात. मोठ्या कष्टाने आयुष्यभर कष्ट करून पैसे साठवायचे, कशासाठी कि म्हातारपणी कुणाची मेहेरबानी नको, पण एक आजारपण तुमचे सर्व सेव्हिंग संपवते आणि पदरी येते ते नको असलेले परावलंबत्व. त्यासाठी आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच कंपन्यांमध्ये कामगारांसाठी  चर्चासत्रे आयोजित करतो जेणेकरून त्यांना त्यांचे रिटायरमेंटच्या वेळी मिळालेले पैसे वाचवता येतील, विषय एकच असतो "हॉस्पीटलवरचा अनाठायी खर्च कसा वाचवावा" ज्यामध्ये आम्ही अनेक प्रकारचे पर्याय सुचवितो. बऱ्याचदा जर योग्य नियोजन केले तर तुमच्या साठवलेल्या पैश्यांच्या व्याजावरच मेडिक्लेमचे प्रिमियम भागू शकतात. 

 काही महत्वाचे मुद्दे;
 १. ज्यांचे वय ७०च्या पुढे गेले आहे त्यांनी आहे तोच मेडिक्लेम चालु ठेवा. नसेल तरी ८० वयापर्यंत मिळू शकतो. 
२. आधीचे काही आजार असतील तर ते कव्हर होतील असे देखील पर्याय उपलब्ध आहेत, थोडी माहिती काढा. 
३. ज्यांचे वय ७० च्या आत आहे, ते आपल्याला मिळणारे फायदे पुन्हा एकदा तपासून घ्या किंवा सरळ दुसरा चांगला प्रायवेट मेडिक्लेम घ्या. 
४. हेल्थ इंश्युरन्स माणशी किमान ३ लाखाचा असावा,  ५ ते १० लाख आयडियल. 
५. तुम्हाला तुमच्या नोकरीच्या ठिकाणी जरी हेल्थ इन्शुरन्स मिळाला असेल तरी एक अजून पॉलिसी असणे कधीही चांगले.  
६. घरातील ज्येष्ठ नागरीक सर्वात पहिले कव्हर करा. 
७. कमी प्रिमियम म्हणजे कमी फायदे - काही अपवाद वगळता. 
८. फ्लोटर पौलीसी कुटुंबासाठी सर्वोत्तम. 
९. तुमचे आई-वडील, तुम्ही-तुमची पत्नी आणि तुमची मुले असे सर्वजण एकाच मेडीक्लेम मध्ये कव्हर करू शकतो ज्यामुळे प्रिमियम कमी पण फायदे जास्त मिळतात.
१०. काही पर्याय असे देखील मिळू शकतात ज्यामध्ये तुमचे वय कितीही असले तरी पॉलिसी घेण्यापूर्वी तुमची आरोग्य तपासणी करावी लागत नाही. 
११. अतिशय गरीब कुटुंबासाठी पुणे महानगरपालिकेचे काही उपक्रम आहेत, त्याचा लाभ घ्या. किंवा राजीव गांधी आरोग्यदायी योजनेचा लाभ घ्या. 

असे खूप पर्याय आज उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुमचे पूर्विचे सर्व आजार पहिल्या दिवसापासून कव्हर केले जाऊ शकतात आणि तेही कोणत्याही आरोग्य तपासण्या न करता. जरी तुमचे वय ८० झाले असेल तरीही. होय, त्यामुळे आजच आपल्या आरोग्य विमा सल्लागाराला भेटा आणि शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानाने आत्मनिर्भर जगा.

Wednesday, 21 October 2015

INVESTOR AWARENESS PROGRAM

We would like to take this opportunity to inform you that Shraddha FinSol has organized 
"INVESTOR AWARENESS PROGRAM" in association with Motilal Oswal Securities Ltd. 
DATE- 23rd Oct 2015
Day: Friday 
TIME- 5pm to 7pm
VENUE- Millennium Tower, 5th Floor, Bhandarkar road, Pune-411004.
Note: Best opportunity to understand the present status of market and future possibilities.
Entry: Free
For Registration: SMS your name on 9822513801

Friday, 16 October 2015

What is CIBIL record? FAQs

20 Quick FAQ on Credit Score
In India, there are 4 credit information companies licensed by RBI. The Credit Information Bureau (India) Limited(CIBIL) started functioning from January 2001. Subsequently in 2010, Experian, Equifax and Highmark were given licenses by RBI to operate as credit information companies in India.
You may be knowing that CIBIL uses a three-digit numbering system for the scoring which ranges between 300 to 900, the higher the score is better. They have recently started an new version 2.0 for doing the credibility check by a different method, which is yet to catch up.
Here are 20 frequently asked questions that our team faces from the borrowers on a regular basis & hence I thought of compiling them here for all to read and share the knowledge.
1. What happens when I have a great credit score?
Truly, it doesn't enhance your loan credibility as of now. The direct effect is yet to be designed by the lenders. As of now, only the credit appraiser feels comfortable that you are not defaulting on any other credit. So, the impact is that of your not being bad, not being very good.
2. Can a credit score be really improved?
Good practice of returning borrowed funds on time enhances your credibility and improves the score. But the score is a trend, which develops gradually. Same like a character of a person. It can't be drastically improved or altered. So, if you suddenly pay off all your debts, your credit score does not jump up immediately.
3. Will a lender give me loan at a better rate if i have a good credit score?
Lenders look at various comforts in a home loan application and credit score is one of them. The profile of the borrower, his educational background, number of years in service, number of dependents, income, savings, other assets, property he chooses to buy and many more. So, it will be wrong to say that one gets a better deal just for great credit score.
4. Will i get a loan quicker if i have a good credit score and submit the report?
That is completely untrue. Unlike the commercials which come on media, the processing of any loan takes a basic period of time as the credit appraiser waits for reports from various other agencies to issue a loan approval letter. Credit score is available online and rather a very less time-consuming thing. By having a credit report in hand, doesn't enhance the process-time. Most of the lenders anyways does the credit check once more.
5. What if one credit report company shows bad numbers but another one shows good?
Most of the lenders now are using one major credit scoring service & others are yet to catch up. Even then when above is the scenario, the final call lies with the credit appraiser of the lender. There has been cases where though the credit report has come unsatisfactory or low in numbers, with clear justification & supporting proof of the reason, credit managers have agreed to do the loan. They are authorised to take calls on such home loan applications.
6. If I have never borrowed or never even had a credit card, will my score be low?
Yes, it will be. Gone are those days when our previous generation boasted of never borrowing a single penny. Credit looks at a new borrower with a magnifying lens and scrutinises more critically thinking 'why no one has ever lent him a single penny?' Don't get it wrong. You are not being encouraged to borrow more than you can pay up, but a basic credit card facility or a home loan for tax-savings will be no harm to have.
7. What if a wrong report has been uploaded on one of these bureaus? How to address that & get rectification?
Please understand that all these credit bureaus are maintaining a mere databank and has no direct influence on a low or high score. Yes, they draw up the numbers, but strictly basis the input they receive from various lenders where the individual has borrowed from. If you ever notice any anomaly, you can download the report yourself, find out the flaw, speak with the lender who has wrongly uploaded erroneous data, ask them to send the corrected information to the credit bureau and the bureau will correct it within 3 days. But if the discrepancy isn't resolved between the borrower and the lender, then credit bureau can not change anything on their own accord.
8. What if I can not contact the lender who uploaded the issue and sold the portfolio to another unknown company?
That is a big concern as contacting the current portfolio holder, if not the lender, is a tough task. Generally customers with very old issues face this. But in the current digital world, is it that impossible to find a company out, especially when they are also trying to locate you?
9. Will my employment get affected because of my low score?
These days, many employers have started perusing credit scores of potential employees, especially the financial services companies. As mentioned earlier, many consider the credit report as reflection of the character and try to read the person through that. Without saying that it is the right way, I am only presenting facts here.
10. Will my employing company's credit history affect my credibility?
Yes, it will. If you are employed by a company which is defaulting on their own loan to one or various lenders, then being an employee of that company, lenders may refuse to extend a loan to you, basis 'unstable job'. They might simply consider that the financial strength of the employer is poor and your pay might get affected too, if it already has not!
11. Will my colleague's bad credit history affect me in any way?
Surprising, but yes! If many employees of a company had defaulted in the past, the lender may blacklist the company and decline to lend you without any fault of yours.
12. Does cancellation of a credit card affect my credit score?
It does not if you inform the bank, pay up the dues, take a no-due letter and then cancel the card. But if you just decline to pay any dues and think that destroying the card is the end of it, it is not.
13. NRI-s who apply for loans will also have a credit rating?
NRI-s will have credit rating in their respective countries. Those reports are generally required to process a home loan in India. However, countries where credit scoring system is not followed, no such report can be provided by the potential borrower. Please note that credit score report of an NRI also is also generated by the lender here in India, basis PAN card and Indian address. So, those you think getting an NRI status is end of the problem, it is not.
14. What happens to my credit score when I negotiate with the bank/lender and do a settlement payment?
Credit reports are quite categorised. Closing a loan by paying the complete due amount and closing with lesser amount by negotiating a deal doesn't get reported in the same way. So, potential borrowers who exclaim-"I don't have either credit or default elsewhere." need to introspect on that statement. If you pay, say, 20,000/- as 'settlement amount' to a lender when they claim to have a 80,000/- due, they will report that to credit scoring company too.
15. What happens when banks/lenders writes off a loan against my name and I never pay?
That's truly bad and if the amount isn't a small one like a couple of thousand, which can be considered 'overlooked', all lenders in future may decline to lend you. 'Write-off' means you never paid off the dues and the lender had to let go of the money completely either because they could not trace you or you have denied to pay. That is not a welcome 'character' by the new lender.
16. Can my house-renting, applying for a gas connection or getting a post-paid connection be affected because of my credit score?
In India, though this practice is yet not so prevalent due to lack of knowledge, but the day is not far away when all credits are going to be routed through this check.
17. Will my credit score impact my family members such as wife, children & siblings?
It does. Lenders upload your address, DOB, landline and mobile number, father's name, spouse name(if available) etc. along with the data. This is to ensure that people with same name do not get each other's report. So, if you default in a loan & your brother applies later, his loan might get rejected. Sounds unreal, but there has been incidence when son-in-law's home loan application was denied for bad credit report of father-in-law where wife was co-applicant and her PAN card showed her father's name!
18. Does being a guarantor also gets me reported at the credit bureau?
Of course. Please read article "5 Factors to check before being a guarantor" which was published in moneycontrol.com to know more about it.
19. Can I raise a dispute with the credit scoring company, if I identify any anomaly in my report and/or scoring?
As explained earlier, please raise the dispute with the reporting lender instead of the credit scoring company, since the scoring company bases their numbering on the data reported and available with them with no power of alteration.
20. Can I access my own credit report since the lender I have applied with, isn't telling me which bank has reported my default?
The lender who is perusing your loan application now, has a limited access to your data. Though they can see the score and the default type, they can not see the uploading lender's name. For getting that information, you can download the report yourself by paying minimal fee online and then take necessary course of action with the reporting lender for rectification, if any.
(Source of Information: Internet)

Friday, 9 October 2015

गेले एक वर्ष पुण्यातील क्याशलेस सेवा बंद का आहे ?

साधारण गेल्यावर्षी डीसेंबरमध्ये चारही सरकारी इन्शुरन्स कंपन्यांनी एकाच वेळी पुण्यामधील क्याशलेस सुविधा बंद केली. जवळपास एक वर्ष पूर्ण होईल आता या घटनेला, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना या बदलाची झळ पोहोचलीच आहे कारण अजूनही देशातील जवळपास ७० टक्के मेडिक्लेमचे ग्राहक फक्त  चार सरकारी इन्शुरन्स कंपन्यांचेच आहेत आणि बाकी इतर प्रायवेट इन्शुरन्स कंपन्यांचे. त्यावेळी तुम्ही रोज वर्तमानपत्रामध्ये या रिलेटेड बातम्या वाचल्याच असतील. पण मग म्हणजे नक्की झालं काय होत ते आज आपण समजून घेऊया. 

साधारणतः या चार इन्शुरन्स कंपन्या हेल्थ इन्शुरन्स फक्त विकण्याचे काम करतात  आणि जेव्हा त्यांचा ग्राहक एखाद्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी भरती होतो तेव्हा त्या उपचारांचे पैसे (किंवा क्याशलेस सेवा म्हणा ) संलग्न असलेल्या हॉस्पिटलला दयायचे कि नाही आणि दिले तर किती दयायचे हे सर्व काम या इन्शुरन्स कंपन्या दुसऱ्या प्रायवेट कंपनीला सोपवतात ( ज्याला आपण आऊट सोर्ससिंग असे म्हणतो ) अशा प्रायवेट कंपन्यांना थर्ड पार्टी एडमिनिसट्रेटर ( टी.पी.ए ) असे म्हणतात उदा. मेडीअसीस्ट, एमडीइंडिया वै.

इन्शुरन्स कंपन्या कायम आपला क्लेम सेटलमेन्टवर किती खर्च होतो आहे यावर बारीक लक्ष ठेऊन असतात. मागील बरेच वर्षांचा क्लेमचा डाटा तपासल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आले कि आपला ८० टक्के क्लेमचा खर्च फक्त काही निवडक शंभरएक आजारांवर (एलमेन्ट ) होतो.  अशा आजारांची लिस्ट तयार करून मग त्यांनी पुढे पी.पी.एन.ची  योजना आखली ती अशी. कि समजा, सध्या चारही सरकारी इन्शुरन्स कंपन्या मिळून पुणे शहरातील २०० हॉस्पिटल्स मध्ये क्याशलेस सुविधा देत आहेत आणि महिन्याला १०० रुपये या २०० हॉस्पिटल्सला क्लेमपोटी वाटत आहेत, तर त्यांनी ठरवले कि आपण पुण्यातील फक्त २० हॉस्पिटल्समध्येच इथून पुढे क्याशलेस सुविधा दयायची आणि त्याच हॉस्पिटल्सला निवडक २० मध्ये स्थान दयायचे जे आपण सांगितलेल्या अटींवर आणि किमतीवर काम करतील. हॉस्पिटल्सला हे गाजर दाखवायचे कि जे १०० रुपये आम्ही आधी २०० हॉस्पिटल्समध्ये वाटत होतो ते आता निवडक २० हॉस्पिटल्समध्ये वाटणार आहोत म्हणजे हॉस्पिटल्स त्या निवडक २०च्या यादीमध्ये स्थान मिळवण्यासाठी काहीही अटी मान्य करतील.

 ज्या चार निम्न-सरकारी (पी.एस .यु ) इंश्युरन्स कंपन्या आहेत (नेशनल, न्यु इंडिया, ओरिएन्टल आणि युनायटेड इंडिया ) त्यांनी एकत्र येउन एक संघटना केली ज्याला नाव दिले जीप्सा (GIPSA). या संघटनेने भारताच्या प्रत्येक प्रमुख शहरात पी.पी.एन ( PPN ) नावाची योजना राबवली (४-५ वर्षांपूर्वी क्लास ए शहरांमध्ये उदा. दिल्ली, मुंबई आणि गेल्या वर्षी क्लास बी शहरांमध्ये उदा. पुणे, हैदराबाद ). आता हि पी.पी.एन (PPN) योजना म्हणजे नक्की काय तर, जीप्सा ( GIPSA ) ने ठरवले कि शहरातील काही ठराविकच हॉस्पिटल मध्ये क्याशलेस सेवा चालू ठेवायची आणि बाकी सर्व हॉस्पिटल मध्ये क्याशलेस सेवा बंद करायची. याचा फायदा GIPSA म्हणजेच इंश्युरन्स कंपन्यांना असा होणार आहे कि त्यांचा उपचारांवरचा खर्च कमी झाला , कारण त्यांनी या मार्गे सर्व हॉस्पिटल्सला कोंडीमध्ये पकडून कमी दरांमध्ये उपचार देण्यास भाग पाडले.

प्रथमदर्शनी तुम्हाला वाटेल कि हे तर आपल्या भल्यासाठीच होत असावे, परंतु जर शांतपणे सर्वांगीण विचार केला तर अनेक प्रश्न उपस्थित होतात जस कि;
१. उपचारांचे दर कमी झाले तरी प्रिमियम काही कमी होत नाहीये. सामान्य माणसाला त्याचा काहीच फायदा दिला जात नाहीये असं दिसतंय.
२. काय सरकारी कंपन्या असा अचानक निर्णय घेऊ शकतात ? ज्याचा सामान्य माणसाला त्रास होऊ शकेल ?
३. मेडिक्लेम घेतांना माणूस हे बघतो कि आपल्या घराजवळच किंवा विश्वासाची हॉस्पिटल्स त्या इंश्युरन्स कंपनीच्या यादीमध्ये आहेत ना ! आणि आता जर त्यांना वगळल गेलं असेल तर ?
४. अजून एक जळजळीत प्रश्न, कि कॉर्पोरेट/ ग्रुप  पॉलीसी असणाऱ्यांना असे निर्बंध नाहीत ! हे सर्व निर्बंध फ़क्त स्वतः पॉलीसी विकत घेणाऱ्या लोकांसाठीच आहेत !! तर असा भेदभाव का ?
५. बर, हॉस्पिटल्सला कमी दरामध्ये तेच ऑप्रेशन करायला भाग पाडल्यामुळे मिळणाऱ्या सेवा-सुविधा किंवा वापरलं जाणार मटेरियल जर हलक्या दर्ज्याच वापरावं लागलं तर ? ती चूक कोणाची ? आपण नेहमी ज्यांना हक्काने कोसतो त्या हॉस्पिटल्सची ?

आता तुमच्या लक्षात आले असेलच कि नुकसान हे सामान्यमाणसाचेच झाले, अत्यंतिक कमी किमतीमध्ये उपचार दयावे लागत असल्यामुळे, परवडण्यासाठी  हॉस्पिटल्स खर्चामध्ये नक्की कुठे कपात करत असतील ? म्हणजे ज्या हॉस्पिटल्समध्ये क्याशलेस मिळतो तेथील उपचारांची क्वालिटी चांगली मिळेल का ? जो मेडीक्लेम काही लोकांनी गेली कित्येक वर्ष प्रामाणिकपणे रिन्यु केला, त्याचे हे फळ मिळाले ?! आणि जिथे सवलतीच्या प्रिमियममध्ये मेडीक्लेम वाटले जातात अशा कोर्पोरेट लोकांना या सर्व प्रकारातून सोयीस्कर रित्या वगळण्यात आले ! कारण, एकच, सामान्य माणूस संघटीत नाही ! 

या सर्व परिस्थितीवर उपाय काय; 

१. ज्यांचा प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीचा मेडिक्लेम / हेल्थ इन्शुरन्स आहे त्यांनी घाबरू नका - वरील विश्लेषण फक्त सरकारी इन्शुरन्स ग्राहकांसाठी आहे. 
२. ज्यांचे वय ७०च्या पुढे गेले आहे त्यांनी आहे तोच मेडिक्लेम चालु ठेवणे, पर्याय नाही. 
३. ज्यांचे वय ७० च्या आत आहे, ते एकतर पोर्टेबीलिटी होतय का ते तपासून घ्या आणि शिफ्ट करा किंवा सरळ दुसरा चांगला प्रायवेट मेडिक्लेम घ्या. 
४. हेल्थ इंश्युरन्स माणशी किमान ३ लाखाचा असावा
५. प्रत्येक कुटुंबाचे किमान एक आणि कमाल दोन हेल्थ इंश्युरन्स असावेत. 
६. घरातील ज्येष्ठ नागरीक सर्वात पहिले कव्हर करा. 
७. कमी प्रिमियम म्हणजे कमी फायदे - काही अपवाद वगळता. 
८. फ्लोटर पौलीसी कुटुंबासाठी सर्वोत्तम. 
९. तुमचे आई-वडील, तुम्ही-तुमची पत्नी आणि तुमची मुले असे सर्वजण एकाच मेडीक्लेम मध्ये कव्हर करू शकतो ज्यामुळे प्रिमियम कमी पण फायदे जास्त मिळतात. 
       


विचार करा, आपण आपली पहिली गाडी / मोबाईल / टि. व्ही. विकत घेतांना त्या वस्तूच्या फिचर सोबत त्याचे सुटे पार्ट किती महाग आहेत तसेच त्याचे सर्विस स्टेशन किती आहेत आणि ते घराजवळ आहेत का, या आणि अशा कितीतरी बाबींचा  विचार करतो.

पण इतका विचार आपण हेल्थ इन्शुरन्स विकत घेतांना का नाही करत ? तेंव्हा आपण फक्त प्रिमियम कोणत्या कंपनीचा सर्वात स्वस्त आहे, त्याचाच विचार करतो. एखाद्याच्या मृत्यूपश्चात, त्या व्यक्तीच्या उपचारांच्या खर्चाचे कर्ज पुढील काही वर्ष त्याच्या नातेवाईकांना भरतांना पाहिलंय कधी ?

लक्षात घ्या, आज हेल्थ इन्शुरन्स विकत घेण खूप सोप्प आहे, लोक तर आजकाल ऑनलाईन विकत घेणे प्रतिष्ठेचे समजू लागले आहेत, परंतु एकदा विकल्यानंतर योग्यती माहिती व सेवा देण तितकच महत्वाचं ! आणि ती माहिती जसं कि, कोणते आजार कव्हर होतील आणि कोणते नाही, कोणते रुग्णालय कशासाठी जास्त चांगलं आहे, क्लेम कधी-कसा-केव्हा करावा, रुग्णालयात कशाचे पैसे भरावे - कशाचे नाही वै. फक्त एक अनुभवसंपन्न व्यक्तीच सांगू शकते.

Thursday, 1 October 2015

Performance comparison of various asset classes- Sensex (Equity), Fixed Deposit (Debt), Gold and Silver

Performance comparison of various asset classes- Sensex (Equity), Fixed Deposit (Debt), Gold and Silver and the impact of inflation on them beginning from the financial year 1979-80.
Why 1979-80?
That is the year from which Sensex came into existence with base as 100.
1) Assume you’ve invested Rs.1 lakh each in FD, gold, silver and Sensex 35 years ago. As of 31’st March 2013 the value is as follows:
FD- Rs.16.94 lakhs, Gold- Rs.36.51 lakhs, Silver- Rs.28.39 lakhs and Sensex- Rs.2.23 crores
2) Unlike other assets mentioned above, Sensex has dividend yield in addition to capital growth.
Assuming a dividend yield (duly reinvested) of 2% on an average, the Sensex returns work out to Rs.4.05 crores
3) In terms of percentage, the 35 years return (as given above) is as follows: FD-8.41%, Gold- 10.82%, Silver- 10.03% and Sensex- 16.72% (18.72% if dividend yield is as assumed above)
4) When we talk about returns, we’ve to talk about inflation too.
The average annualized inflation for the above period is 7.57%.
5) If Rs.1 lakh has been kept under the mattress instead of being invested, it’s value has come down to mere Rupees six thousand (i.e.)purchasing power of rupee reduced by whopping 94% over 35 year period.
6) What we should look for is real returns (i.e.) returns after inflation and taxes. Since tax differs from each asset class and income category, we’ve taken only inflation. Inflation is common for all
7) After adjusting for inflation, the asset classes have grown by following annualized rate in real terms.
FD- 0.84%, Gold-3.25%, Silver-2.46% and
Sensex- 9.15% (around 11% including dividend yield). These numbers matter a lot.
This is what our wealth would have grown after adjusting for inflation. Since we know the tax details for each asset class and for our income, we can work out the return after taxes too.
FD would automatically turn negative. Gold and Silver would have provided a negligible return. Only equity would have provided a real rate of return of above 7%.
8) In the long run, the best we can aim and get even in asset classes like equity and real estate is real return of around 4%+. Growing money is that difficult. More important is not losing the money.
9) Gold’s real rate of return of 3.25% is made possible due to rupee significantly depreciating between 1980s to early last decade. Otherwise we might have got even a negative return. We’ll explain this by example.
Assume the rupee dollar conversion rate is 1 USD = Rs.60.
For illustration purposes, let us assume the price of 1 gram of gold is 1 USD. With the above conversion rate, the value of 1 gm of gold is Rs.60. Imagine a scenario when rupee depreciates by 100% (i.e.) 1 USD = Rs.120/- The gold price remains the same at 1 USD. The value of our gold would increase by 100% to Rs.120/- though the price has not changed in the international markets and being the net importer of gold.
10) Please use FD for contingency or emergency funds.
Let gold be part of social requirement and not exceed 10% of investment portfolio.
Silver is again part of only social or cultural needs.
Equity is for building wealth. We believe real estate also can build wealth but it was the ideal option till 2006.
In nutshell: Proper Diversification, Disciplined and Scientific Financial Planning can result Instrumental Wealth.
Shirish Kulkarni
CEO
Shraddha FinSol

Tuesday, 29 September 2015

You know Meditation, Now learn Financial Meditation !

Intro: People practice meditation for spiritual growth and liberty under the guidance of spiritual master,
This Seminar will make you understand what is Financial Meditation, how to practice it, in order to achieve Financial Growth and Financial Liberty.
Call us to arrange this Free Informative Seminar at your group, company, organization, association or college.

Note: This seminar is purely for educational purpose, to spread awareness about Financial Literacy. Check out our intro-video.

Shraddha FinSol - Pune
Phone: 9822513801
Click Here for Info-Video

Monday, 28 September 2015

आर्थिक गुंतवणुक, सहा अंधळे आणि हत्ती

मित्रांनो, सहा अंधळे आणि हत्तीची गोष्ट आपल्या सर्वाना माहितच आहे. की एकदा सहा अंधळे, हत्ती नेमका कसा असतो हे समजण्यासाठी प्राणी संग्रहालयात जातात, प्रत्येक जण तेथील हत्तीच्या निरनिराळया अवयवांना स्पर्श करून पुन्हा एकत्र भेटतात.

आपले अनुभव सांगतांना, जो पायाला स्पर्श करतो तो म्हणतो हत्ती खांबासारखा आहे, जो कानाला स्पर्श करतो तो म्हणतो हत्ती सुपासारखा आहे, जो शेपटीला स्पर्श करतो तो म्हणतो हत्ती दोरखंडासारखा आहे, इ.

या कथेतील हत्ती म्हणजे तुमची आर्थिक गुंतवणूक (फायनांशियल प्लानिंग ) समजा आणि तुम्हाला सल्ला देणारी व्यक्ती जर फ़क्त इन्शुरन्स किंवा रिअल इस्टेट किंवा SIP किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करणेच हिताचे आहे असे सांगत असेल तर आज ही कथा वाचल्यानंतर आपण ओळखु शकाल असे सल्लागार (अंधळे).

तुमचे फायनांशियल प्लानिंग आमच्याकड़े सोपवा आणि शास्त्रोक्त तसेच एकाच छता खाली उपलब्ध असलेल्या आणि आम्ही सुचवलेल्या विविध आर्थिक गुंतवणुकीच्या पर्यायांचा फायदा करून घ्या.

लक्षात ठेवा, योग्य व्यक्तीकडून मिळालेला योग्यवेळचा - योग्य सल्ला आणि दूरदृष्टी या त्रिसूत्रीमध्ये  आर्थिक यशाचे रहस्य दडलेले आहे.

फोन करा आणि प्रत्यक्ष भेटा;
शिरीष कुलकर्णी
फाउंडर आणि सी.ई.ओ.
श्रद्धा फिन-सॉल
पुणे.
मोबाईल : 9822513801
वेबसाईट: www.shraddhafinsol.com
फेसबुक पेज : www.facebook.com/shraddhafinsol

Thursday, 24 September 2015

Difference Between Bond and Equity - Good to Know Info !


Difference
Bond
Stock
Kind of Instrument
Debt
Equity
Meaning
In finance, a bond is a debt security, in which the authorized issuer owes the holders a debt and is obliged to repay the principal and interest
In financial markets, stock capital raised by a corporation or joint-stock company through the issuance and distribution of shares
Centralization
Bonds markets, unlike stock or share markets, often do not have a centralized exchange or trading system
Stock or share markets, have a centralized exchange or trading system
Holders
Bond holders are in essence lenders to the issuer
The stock holders own a part of the issuing company (have an equity stake)
Kind
Securities
Securities
Yield Analysis
Nominal yield, Current yield, Yield to maturity, Yield curve, Bond duration, Bond convexity
Gordon model, Dividend yield, Income per share, Book value, Earnings yield, Beta coefficient
Participants
Investors, Speculators, Institutional Investors
Market maker, Floor trader, Floor broker
Issued By
Bonds are issued by public sector authorities, credit institutions, companies and supranational institutions
Stock are issued by corporation or joint-stock companies
Owners
bondholders
stockholders/shareholders
Derivatives
Bond option, Credit derivative, Credit default swap, Collateralized debt obligation, Collateralized mortgage obligation
Credit derivative, Hybrid security, Options, Futures, Forwards, Swaps
 
Source of Info: Internet (Diffen)

Tuesday, 22 September 2015

Fixed Deposit / एफ.डी. करताय ?

टॅक्स फ्री इंटरेस्ट मिळवता आला तर? होय अशी एक योजना आमचे कड़े आहे की ज्यात आपल्याला आपल्या एफ.डी. वरील उत्पन्नावर टॅक्स भरावा लागणार नाही.
अट : फ़क्त एक लाखावरील गुंतवणुकीसाठी
अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष भेटा : 9822513801

Sunday, 13 September 2015

विजयने आत्महत्येचा प्रयत्न का केला ?

विजय, 
मुळचा कोल्हापूरचा, शिक्षणापासून पुण्यामध्येच स्थाईक झालेला, सध्या हिंजेवाडीतील एका नामवंत आय. टी. कंपनीमध्ये चांगल्या पगारावर कामाला होता, घरी म्हणाल तर त्याची बायको प्रिया, एक १० वर्षाची गोंडस मुलगी अवनी आणि आई-वडील असायचे. सगळ अगदी सुखात चालू होत, साधारण ४-५ वर्षांपूर्वीच औंधपाशी फ्ल्याट घेतला होता आणि गेल्यावर्षी दिवाळीला स्विफ्ट कार. एकुलता एक मुलगा असल्यामुळे घराची जवाबदारी त्याच्यावरच होती, परंतु ऑफिसच टेंशन त्यानी कधीच घरी आणलं नाही. सगळ कसं अगदी सुखात आणि ठरवल्याप्रमाणे चालू होत - गेल्या ६ महिन्यांपूर्वीपर्यंत…
६ महिन्यांपूर्वी विजयला ऑफिसमध्ये फोन आला, प्रियाचा आवाज रडवेला होता, म्हणाली लवकर हॉस्पिटलला पोहोचा बाबांना हार्ट अट्याक आला आहे. विजयने तडक हॉस्पिटल गाठले, पुढचे १०-१५ दिवस फक्त ऑफिस-घर-हॉस्पिटल फिरत होते सगळे. कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स ३ लाखांचा होता त्यामुळे एजीओप्लास्टीचा खर्च ६ लाख रुपये झाला तरी वरती फक्त ३ लाख खर्च आला. बाबा आता बरे होते, धोका टळला होता.
शिक्षणाचे लोन फिटल्यानंतर लगेच लग्न कि लगेच घर कर्ज त्यामुळे फ्ल्याटचा, कारचा हप्ता क्रेडीट कार्डचे पैसे सगळी कसरत चालू होती, जे काही साठले होते ते सगळे पैसे बाबांच्या आजारपणामध्ये गेलेले, पण विजय लढत होता.
२-३ महिन्यांपूर्वीचीच गोष्ट असेल, कंपनीच्या कारने मुंबईला चालला होता, मिटिंग होती कसलीशी, एक्सप्रेस वे वर दरड कोसळल्यामुळे जुन्या हायवेनी चालले होते, कामशेतच्या अलीकडे एका वळणावर त्याच्या कारला अपघात झाला. विजय कसाबसा वाचला, जवळ-जवळ दीड महिना हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. छातीखाली काहीच संवेदना राहिल्या नव्हत्या. प्रिया पार विस्कटली होती, बाबांना अजून टेन्शन नको म्हणून आई सोबत कोल्हापूरला पाठवून दिले होते.
गेला एक महिना विजय घरीच होता, त्याच्या आजारपणामध्ये प्रियाने दागिने मोडले होते, कार मित्राला विकली होती. अठवड्यापूर्वी कंपनीने ई-मेल पाठवला होता - दिलगिरी सोबत राजीनामा मागितला होता.
परवा दुपारी विजयला झोप लागल्याची पाहून प्रिया हळूच ल्याच लाऊन भाजी आणायला बाहेर पडली. विजय झोपला न्हवताच, ड्रेसिंगचे सर्जिकल ब्लेड घेऊन त्याने मनगटावर फिरवले…
आज सकाळपासून प्रिया रडत होती, देवाला आर्जवं करत होती तेंव्हाच डॉक्टरांनी हाक मारली, म्हणाले विजय शुद्धीवर आलाय, रक्त खूप गेल्यामुळे अजून थोडा धोका आहे पण परिस्थिती आटोक्यात आहे.
सूचना : वरील घटना सत्यघटना असून, व्यक्तींची नावे बदलण्यात आली आहेत, मी हॉस्पिटलसोबत काम करतांना आलेल्या अनेक अनुभवांपैकी एक.
काही प्रश्न;
१. तुमचा हेल्थ इन्शुरन्स आहे ?
२. तुमच्या कंपनीने तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स दिला आहे तो पुरेसा आहे असे वाटते ? तुम्ही त्याच कंपनीमधून निवृत्त होणार आहात ? आज-काल कोणी एकाच कंपनीमध्ये ५ वर्षांपेक्षा जास्ती टिकत?
३. सध्या कमीत कमी २ हेल्थ इन्शुरन्स असावेत असे म्हणतात - हे तुम्हाला ठाऊक आहे ?
४. काय तुमच फायनानशीअल प्लानिंग योग्य आहे?
सर्व प्रकारच्या हेल्थ इन्शुरन्स बद्दल संपूर्ण माहितीसाठी फोन करा आणि समक्ष भेटा
श्रद्धा फिन-सॉल
बिबवेवाडी, पुणे.
9822513801
www.shraddhafinsol.com

Real Estate Investment - Is it Worth??

A must see video for those who think investment in property will never fail.
Meet us for your financial planning.

Sunday, 25 January 2015

Less Known Facts: Mediclaim Vs Critical insurance


#Mediclaim is to cover the hospitalization expenses. Mediclaim covers even the hospitalization due to critical illness. But critical #illness insurance is to cover the reduction or decrease in your earning capacity due to critical illness insurance. That’s why you will be paid the full sum assured in critical illness insurance regardless of the hospital bills.

#Mediclaim is one of the risk management tools. If you are not covered with mediclaim, your wealth may erode just like that if there is a hospitalization. By taking a mediclaim policy you are actually protecting your wealth. Call : 9822513801