Monday, 29 February 2016

म्युचल फंड आणि tax benefit, वाचा आणि शेअर करा !

गुंतवणूकदारांना बऱ्याचदा असा प्रश्न पडतो कि आपण ज्या म्युचल फंडमध्ये गुंतवणूक केली आहे त्याचा फायदा सेक्शन 80C अंतर्गत आपल्याला नक्की मिळेल ना ? तर हा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे कारण बहुतांशी लोक फक्त tax benefit मिळावा या उद्देशानेच म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करतांना दिसतात. परंतु फक्त काही प्रकारच्या म्युचल फंडमध्ये केलेली गुंतवणूकच तुम्हाला 80C अंतर्गत करसवलत देऊ शकते आणि आपण निवडलेला म्युचल फंड जर नेमका त्या प्रकारामध्ये मोडत नसेल तर आपणाला 80C चा कोणताही फायदा मिळू शकणार नाही. 

त्यामुळे म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वीच आपण सर्व माहिती व्यवस्थित घेणे अतिशय महत्वाचे असते. तसेच कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणुकीचा एक आराखडा तयार असणे गरजेचे असते. एकदा गुंतवणूक केली कि नंतर त्यास सुधारणे अतिशय अवघड आणि नुकसानदायक ठरू शकते.
तर आपण पाहूया असे फंड्स ज्यात tax benefit मिळू शकते;
Equity Linked Savings Scheme: इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम  प्रकारच्या फंड मध्ये जास्तीत जास्त एक लाख रुपयांची गुंतवणूक सेक्शन 80C अंतर्गत मोडते. आपण जर सिप किंवा SIP द्वारे गुंतवणूक करीत असाल तरी ते चालू शकते. साधारणतः ELSS मध्ये तुम्हाला कमीतकमी तीन वर्षे तुमची गुंतवणूक ठेवावीच लागते, म्हणजेच काढता येत नाही परंतु हा कालावधी तसा PPF किंवा NSC पेक्षा बराच कमी आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. 
इतर सर्व स्कीम / फंड प्रमाणेच या प्रकारच्या फंड मध्ये देखील डिव्हीडन्ट आणि ग्रोथ असे दोन्ही पर्याय  उपलब्ध आहेत. 
Rajiv  Gandhi Equity Savings Scheme (RGESS) तसेच काही Pension Plan (निवृत्ती योजना ) देखील करसवलत देऊ शकतात.
फक्त tax benefit साठी कोणतीही गुंतवणूक करू नका, तर तुमचा पैसा महागाईच्या भविष्यातील दरापेक्षा जास्त पटीने कसा वाढेल याचा देखील विचार केला गेला पाहिजे, त्याच सोबत फक्त म्युचल फंड किंवा फक्त जमीन किंवा फक्त सोने अशी एकाच प्रकारची गुंतवणूक करणे टाळून, सर्व प्रकारांमध्ये योग्य मार्गदर्शनाखाली केलेली गुंतवणूक तुम्हाला खात्रीशीर श्रीमंत बनवू शकते. 
बरेचसे मोठे / धनाढ्य गुंतवणूकदारदेखील त्यांच्या इतर गुंतवणुकिंसोबतच म्युचल फंडमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात ज्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांचा पोर्टफ़ोलिओ परीपूर्ण बनतो.
तर आजच आम्हाला भेटण्यासाठी आमची वेळ घ्या
शिरीष कुलकर्णी 
श्रद्धा फिन-सॉल 
कृष्ण लिला चेम्बर्स, 
2रा मजला, टिळक रोड,
स.प. महाविद्यालयासमोर, पुणे 30
फोन : 9822513801

Saturday, 30 January 2016

अजून किती वर्षे तुम्ही नोकरी किंवा व्यवसायामधून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून जगणार आहात?

तुमचे सक्रीय उत्पन्न ( Active Income) आणि निष्क्रीय उत्पन्न ( Passive Income) समान आहे का ?
सक्रिय उत्पन्न: तुमचे मासिक उत्पन्न.
उदा. नोकरी, व्यवसाय या मधून मिळणारा पैसा.
निष्क्रीय उत्पन्न: कोणतेही काम / व्यवसाय न करता मिळणारे उत्पन्न.
उदा. फिक्स्ड डिपॉझिटचे व्याज किंवा अन्य कोणत्याही गुंतवणुकीवर मिळणारा परतावा, फ्लॅट किंवा दुकानाचे भाडे वैगरे.
बहुदा हे वाचतांना तुम्ही थोडेतरी अंतर्मुख झाले असाल. एक वेळ अशी आली पाहिजे कि तुम्ही काहीही काम (उत्पन्नासाठी/ उपजिवीकेसाठी) केले नाही तरी तुम्ही आत्ता ज्या लाईफ स्टाईलने जगत आहात तसेच कायम राहू शकाल.
जर तुम्हाला वाटत असेल कि आम्ही हे कोण्या इन्शुरन्स बद्दल सांगत असू तर तसे नाहीये.
आम्ही तुमचे संपूर्ण आर्थिक व्यवस्थापन अशा पद्धतीने करू शकतो कि ज्यामुळे तुम्हाला तुमच्या नोकरी किंवा व्यवसायावरती अवलंबून राहावे लागणार नाही, तुमचे निष्क्रीय उत्पन्न (Passive Income) हे तुमच्या भविष्यातील सक्रीय (Active Income) मासिक उत्पन्ना इतके करायचे असेल तर आम्हाला भेटा.
शिरीष कुलकर्णी
श्रद्धा फिन-सॉल
319, 2रा मजला,
शनिवार पेठ,
सुयोग मंगल कार्यालयाशेजारी,
पुणे 30
फोन: 9822513801
(भेट फक्त पूर्वनियोजित वेळेप्रमाणेच)

म्युच्युअल फंड कि डायरेकट शेअर्स

पहिले तर तुमचे अभिनंदन जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर ! कारण अजूनही लोकांना दोन्हीमधील बेसिक फरक देखील माहित नाहीये आणि ते बापडे अजूनही त्यांच्या इन्शुरन्सला किंवा फार तर एफ.डी.ला त्यांची आर्थिक गुंतवणूक मानण्यात धन्य आहेत. असो.
म्युच्युअल फंड मध्ये आकर्षक परतावा मिळण्यासाठी देखील इक्विटी स्कीम मध्ये गुंतवणूक करणे अपेक्षित असते, याचाच अर्थ म्युच्युअल फंड मध्ये देखील रिस्क हि असतेच (कोणतीही म्युच्युअल फंडची जाहिरात आठवा)
तर रिस्क असतेच परंतु ती डायरेकट इक्विटी पेक्षा कमी असू शकते जर तुमचा म्युच्युअल फंडचा फंड मॅनेजर चांगला असेल, तो सेक्टर चांगला परफॉर्म करत असेल ई.
परंतु सगळेच म्युच्युअल फंड चांगली कामगिरी करत नाहीत बरं का.
(उदा.मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासारखे असते)
परंतु म्हणजे डायरेकट इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे इतके धोकादायक असते का ? तर नाही, ते सर्वस्वी तुमच्या ब्रोकर वरती किंवा जर तुम्ही स्वतः तुमचे निर्णय घेत असाल तर तुमच्यावर अवलंबून असेल.
(उदा. तुमचा विश्वासू फॅमिली डॉक्टर किंवा जवळचे हॉस्पिटल)
म्युच्युअल फंड कि डायरेकट इक्विटी याचे उत्तर हे व्यक्तीनुरूप बदलते, दोन्हीचे काही फायदे आहेत आणि काही तोटेदेखील आहेत, म्हणून श्रद्धा फिन-सॉलमध्ये काही लोकांना फक्त SIP/सिप मधून सुरुवात करण्यास सांगितली जाते, काहींना फक्त म्युच्युअल फंडमध्ये, तर काही लोकांना दोन्हीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.
उत्तर हे व्यक्तीनुरूप बदलते कारण, प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न वेगळे असते, जवाबदाऱ्या वेगळ्या असतात, वय वेगळे असते, या सर्व बाबींचा विचार करून मगच योग्यतो सल्ला देणे रास्त ठरते.
माझ्या मित्राने केले किंवा भावाने केले सुरु SIP/ सिप म्हणून मी पण केले असे करू नका.
तुमचे आर्थिक उद्दिष्ट काय आहे ते पहिले ठरवा आणि मग ते साध्य करण्यासाठी आम्हाला भेटा.
जर आर्थिक उद्दिष्ट ठरवण्यात अडचण येत असेल तर तुमचा महिन्याचा जमा-खर्च लिहून काढा आणि आम्हाला भेटा, आम्ही तुम्हाला मदत करू.
लक्षात घ्या, म्युच्युअल फंड आणि डायरेकट इक्विटी या दोन्हीमध्ये प्रचंड ताकत आहे जी योग्य मार्गदर्शनाखाली वापरून तुम्ही अतिशय श्रीमंत होऊ शकता.
पैसे वाचवणे सोडा (ते जुने झाले) आणि पैशाला कामाला लावा.
श्रद्धा फिन-सॉल
319, 2रा मजला,
शनिवार पेठ,
सुयोग मंगल कार्यालयाशेजारी,
पुणे 30
वेळ: 10 ते 6
फोन: 9822513801