Sunday, 29 November 2015

स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करताय ? हेल्थ इन्शुरन्स / मेडीक्लेम सल्लागार बना आणि अधिक उत्पन्न कमवा !

सविस्तर माहितीसाठी आमची संपूर्ण पोस्ट वाचा, 
फायदे;
1. तुम्हाला मार्केटिंग करण्याची गरज नाही, तुमचे मार्केटिंग आमची कंपनी करेल
2. काही इन्व्हेस्टमेंट / भांडवल नाही
3. कोणतीही परीक्षा नाही
4. तुमच्या सवडीप्रमाणे काम करा
5. कोणतेही टार्गेट नाही
प्रश्न: काय हे MLM आहे ?
उत्तर: नाही, सदर व्यवसायाची संधी म्हणजे MLM नाही किंवा त्याप्रकारची कोणतीही स्कीम वैगरे नाही. 
प्रश्न: मग नक्की काम / व्यवसाय काय आहे ?
उत्तर: सरकारी इन्सुरन्स कंपनीचा मेडिक्लेम / हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी विकण्याचे काम करायचे आहे, ज्यासाठी आमची कंपनी तुम्हाला मार्केटिंग करण्यास मार्गदर्शन करेल तसेच काहीप्रमाणात तुमचे मार्केटिंग करण्यास मदतही करेल ज्यामुळे तुमचा नवीन व्यवसाय चांगला चालेल. 
प्रश्न: मी सध्या नोकरी करतो तर माझ्या नावावर एजन्सी कशी घेणार ?
उत्तर: तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावावर किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर सदर एजन्सी घेऊ शकता आणि काम सुरु करू शकता. जे लोक मेडिकल रिप्रेजेण्टेटिव्ह, हॉस्पिटल किंवा क्लिनिकमध्ये काम करत आहेत किंवा सध्या LIC किंवा इतर कोणताही इन्शुरन्स विकत आहेत त्या लोकांसाठी तर हे अजूनच सोप्पे काम आहे.
प्रश्न: मी सध्या कॉलेजमध्ये आहे / शिक्षण घेत आहे / गृहिणी आहे, मी करू शकतो / शकते का ?
उत्तर: हो, नक्कीच !
प्रश्न: मी पुण्याबाहेर राहतो, काय करावे ?
उत्तर: आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही राहात असाल तरी फक्त एकदा आमच्या ऑफिसला भेट दयावी लागेल त्यानंतर आपण व्यवसाय सुरु करू शकता. 
प्रश्न: किती ट्रेनिंग लागेल, कसे सुरु करावे ?
उत्तर: दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा, प्रत्यक्ष भेटण्यास या म्हणजे साधारण एका तासामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि तुम्ही व्यवसाय सुरु करू शकाल. 
ऑफिसचा पत्ता;
श्रद्धा फिन-सॉल
319, 2रा मजला
शनिवार पेठ
सुयोग मंगल कार्यालयापाशी
पुणे 30
फोन: 9822513801
सूचना: ज्यांना इच्छा असेल त्यांनी वेळ घेऊन प्रत्यक्ष भेटावे, इथे आपले मोबाईल क्रमांक देऊ नये. 

Friday, 27 November 2015

ज्येष्ठ नागरीक आणि मेडिक्लेम

आमचे क्लायंट प्रदीपराव, अतिशय तरुण हृदयाचे आणि सर्वांशी हसतखेळत संवाद साधणारे व्यक्तिमत्व. त्यांच्या आवडीच्या शेअर्सचा कसून अभ्यास असायचा त्यांचा, त्यामुळे बऱ्याचदा आम्हीदेखील त्यांना आमच्या सेमिनारमध्ये मार्गदर्शन करण्यास सांगायचो. पुण्यातील एका नामवंत प्रायव्हेट कंपनीमधून तीन वर्षांपूर्वी रिटायर झाले होते. एकच मुलगी तीही फ्रान्स मध्ये लग्न होऊन गेलेली. उशिरा झाली होती म्हणून लहानपणापासूनच लाडात वाढलेली, लग्नही मोठया थाटात लावले होते. प्रदीपरावांचे कुटुंब सौ. प्रतीक्षाताई यांनी इतके वर्ष घराची बाजू खंबीरपणे सांभाळलेली. गेल्यावर्षीच फ्रान्सला जाऊन आले होते दोघे, दहा दिवस, नव्याने आयुष्य जगलेले. काकांना व्यायामाची खूप आवड, साधे आणि घरचे जेवण, सकाळचे चालणे आणि संध्याकाळी जिम असा दिनक्रम असल्यामुळे त्यांचा चालण्याचा वेग आणि कामाचा आवाका एखाद्या तरुणाला लाजवेल इतका होता. 

साधारण दोनएक महिन्यांपूर्वी नेहमीप्रमाणे पहाटे ५.३०ला  चालायला बाहेर पडले होते, खिशात पॉकेट रेडिओवर गाणी चालू होती आणि नीलायमच्या चौकात रस्ता क्रॉस करतांना अचानक एक इंडिका गाडी त्यांना धक्का देऊन गेली. नंतर कोणीतरी सांगितले कि कुण्या मोठ्या आय. टी. कंपनीची गाडी होती. इतक्या वर्षांचा दिनक्रम असल्यामुळे वाटेत भेटणारी नेहमीची लोक खूप होती. त्यातीलच कुण्याएका सदगृहस्थाला ओळख पटली आणि त्याने जवळच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेउन दाखल केले. ताईनां फोन झाला, त्याही तशाच तडक हॉस्पिटलमध्ये आल्या. सर्व तपासण्या झाल्या परंतु निदान काही होत नव्हते. शेवट डॉक्टरांनी मेंदूचा MRI करायचे ठरवले आणि समजले कि मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झाला आहे. डॉक्टरांनी प्रतीक्षाताईना लगेच ICU मध्ये बोलावले आणि सांगितले कि ताबडतोब ऑपरेशनला घ्यावे लागेल, खर्च किमान ३ ते ४ लाख होईल, लवकर पैसे भरा म्हणजे आम्हाला ऑपरेशनची तयारी सुरु करता येईल. संध्याकाळ झाली होती आणि आत्तापर्यंत एक लाख रुपये भरून झाले होते, ताईंनी काही तक्रार केली नाही, डॉक्टरांना सांगितले कि तुम्ही तयारी करा मी पैसे भरते आहे अर्ध्यातासात. रिक्षा केली, हातामधील बांगड्या आणि कानातले मोडून पैसे घेऊन आल्या सुद्धा. 

पुढे आठवडाभराने काका शुद्धीवर आले, परंतु कंबरे खालचा भाग अजूनही बधीरच होता, त्यांची मुलगी आणि जावई दोघेही आले होते पण काका अजूनही कोणास नीट ओळखत नव्हते. महिनाभर हॉस्पिटलमध्ये काढल्यानंतर गेल्या महिन्यात त्यांना घरी सोडले, पण डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे आता पुढील आयुष्य व्हीलचेअर वरच काढावे लागणार होते. मागच्याच आठवड्यामध्ये त्यांच्या पोर्टफोलिओ बद्दल चर्चा करण्यास गेलो होतो, म्हणाले कुलकर्णी तुमचा सल्ला ऐकला असता तर किमान पाच लाख रुपये वाचले असते आणि खरे तर त्याहून महत्वाचे म्हणजे माझ्या बायकोचे दागिने वाचले असते, इतका फिट मी, कधी शुगरचा त्रास नाही कि मोठे आजारपण नाही पण वेळेपुढे कुणाचे काही चालत नाही हेच खरे. मिश्किलपणे म्हणाले, साठी क्रॉस झालेली आणि त्यात हे दुखणे मागे लागलेले आता कोण देणार मला मेडिक्लेम नाही का ? मी म्हणालो, काका मग मी कशासाठी आहे ? तुम्हाला आत्ता देखील मिळू शकतो मेडिक्लेम आणि तेही तुमच्या आधीच्या सर्व आजारांसहित तुम्हाला आणि काकूंना कव्हर करेल अस्सा. 

मित्रांनो, असे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात येत असतात किंवा सभोवताली घडत असतात. मोठ्या कष्टाने आयुष्यभर कष्ट करून पैसे साठवायचे, कशासाठी कि म्हातारपणी कुणाची मेहेरबानी नको, पण एक आजारपण तुमचे सर्व सेव्हिंग संपवते आणि पदरी येते ते नको असलेले परावलंबत्व. त्यासाठी आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच कंपन्यांमध्ये कामगारांसाठी  चर्चासत्रे आयोजित करतो जेणेकरून त्यांना त्यांचे रिटायरमेंटच्या वेळी मिळालेले पैसे वाचवता येतील, विषय एकच असतो "हॉस्पीटलवरचा अनाठायी खर्च कसा वाचवावा" ज्यामध्ये आम्ही अनेक प्रकारचे पर्याय सुचवितो. बऱ्याचदा जर योग्य नियोजन केले तर तुमच्या साठवलेल्या पैश्यांच्या व्याजावरच मेडिक्लेमचे प्रिमियम भागू शकतात. 

 काही महत्वाचे मुद्दे;
 १. ज्यांचे वय ७०च्या पुढे गेले आहे त्यांनी आहे तोच मेडिक्लेम चालु ठेवा. नसेल तरी ८० वयापर्यंत मिळू शकतो. 
२. आधीचे काही आजार असतील तर ते कव्हर होतील असे देखील पर्याय उपलब्ध आहेत, थोडी माहिती काढा. 
३. ज्यांचे वय ७० च्या आत आहे, ते आपल्याला मिळणारे फायदे पुन्हा एकदा तपासून घ्या किंवा सरळ दुसरा चांगला प्रायवेट मेडिक्लेम घ्या. 
४. हेल्थ इंश्युरन्स माणशी किमान ३ लाखाचा असावा,  ५ ते १० लाख आयडियल. 
५. तुम्हाला तुमच्या नोकरीच्या ठिकाणी जरी हेल्थ इन्शुरन्स मिळाला असेल तरी एक अजून पॉलिसी असणे कधीही चांगले.  
६. घरातील ज्येष्ठ नागरीक सर्वात पहिले कव्हर करा. 
७. कमी प्रिमियम म्हणजे कमी फायदे - काही अपवाद वगळता. 
८. फ्लोटर पौलीसी कुटुंबासाठी सर्वोत्तम. 
९. तुमचे आई-वडील, तुम्ही-तुमची पत्नी आणि तुमची मुले असे सर्वजण एकाच मेडीक्लेम मध्ये कव्हर करू शकतो ज्यामुळे प्रिमियम कमी पण फायदे जास्त मिळतात.
१०. काही पर्याय असे देखील मिळू शकतात ज्यामध्ये तुमचे वय कितीही असले तरी पॉलिसी घेण्यापूर्वी तुमची आरोग्य तपासणी करावी लागत नाही. 
११. अतिशय गरीब कुटुंबासाठी पुणे महानगरपालिकेचे काही उपक्रम आहेत, त्याचा लाभ घ्या. किंवा राजीव गांधी आरोग्यदायी योजनेचा लाभ घ्या. 

असे खूप पर्याय आज उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुमचे पूर्विचे सर्व आजार पहिल्या दिवसापासून कव्हर केले जाऊ शकतात आणि तेही कोणत्याही आरोग्य तपासण्या न करता. जरी तुमचे वय ८० झाले असेल तरीही. होय, त्यामुळे आजच आपल्या आरोग्य विमा सल्लागाराला भेटा आणि शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानाने आत्मनिर्भर जगा.