६ महिन्यांपूर्वी विजयला ऑफिसमध्ये फोन आला, प्रियाचा आवाज रडवेला होता, म्हणाली लवकर हॉस्पिटलला पोहोचा बाबांना हार्ट अट्याक आला आहे. विजयने तडक हॉस्पिटल गाठले, पुढचे १०-१५ दिवस फक्त ऑफिस-घर-हॉस्पिटल फिरत होते सगळे. कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स ३ लाखांचा होता त्यामुळे एजीओप्लास्टीचा खर्च ६ लाख रुपये झाला तरी वरती फक्त ३ लाख खर्च आला. बाबा आता बरे होते, धोका टळला होता.
शिक्षणाचे लोन फिटल्यानंतर लगेच लग्न कि लगेच घर कर्ज त्यामुळे फ्ल्याटचा, कारचा हप्ता क्रेडीट कार्डचे पैसे सगळी कसरत चालू होती, जे काही साठले होते ते सगळे पैसे बाबांच्या आजारपणामध्ये गेलेले, पण विजय लढत होता.
२-३ महिन्यांपूर्वीचीच गोष्ट असेल, कंपनीच्या कारने मुंबईला चालला होता, मिटिंग होती कसलीशी, एक्सप्रेस वे वर दरड कोसळल्यामुळे जुन्या हायवेनी चालले होते, कामशेतच्या अलीकडे एका वळणावर त्याच्या कारला अपघात झाला. विजय कसाबसा वाचला, जवळ-जवळ दीड महिना हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. छातीखाली काहीच संवेदना राहिल्या नव्हत्या. प्रिया पार विस्कटली होती, बाबांना अजून टेन्शन नको म्हणून आई सोबत कोल्हापूरला पाठवून दिले होते.
गेला एक महिना विजय घरीच होता, त्याच्या आजारपणामध्ये प्रियाने दागिने मोडले होते, कार मित्राला विकली होती. अठवड्यापूर्वी कंपनीने ई-मेल पाठवला होता - दिलगिरी सोबत राजीनामा मागितला होता.
परवा दुपारी विजयला झोप लागल्याची पाहून प्रिया हळूच ल्याच लाऊन भाजी आणायला बाहेर पडली. विजय झोपला न्हवताच, ड्रेसिंगचे सर्जिकल ब्लेड घेऊन त्याने मनगटावर फिरवले…
आज सकाळपासून प्रिया रडत होती, देवाला आर्जवं करत होती तेंव्हाच डॉक्टरांनी हाक मारली, म्हणाले विजय शुद्धीवर आलाय, रक्त खूप गेल्यामुळे अजून थोडा धोका आहे पण परिस्थिती आटोक्यात आहे.
सूचना : वरील घटना सत्यघटना असून, व्यक्तींची नावे बदलण्यात आली आहेत, मी हॉस्पिटलसोबत काम करतांना आलेल्या अनेक अनुभवांपैकी एक.
काही प्रश्न;
१. तुमचा हेल्थ इन्शुरन्स आहे ?
२. तुमच्या कंपनीने तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स दिला आहे तो पुरेसा आहे असे वाटते ? तुम्ही त्याच कंपनीमधून निवृत्त होणार आहात ? आज-काल कोणी एकाच कंपनीमध्ये ५ वर्षांपेक्षा जास्ती टिकत?
३. सध्या कमीत कमी २ हेल्थ इन्शुरन्स असावेत असे म्हणतात - हे तुम्हाला ठाऊक आहे ?
४. काय तुमच फायनानशीअल प्लानिंग योग्य आहे?
सर्व प्रकारच्या हेल्थ इन्शुरन्स बद्दल संपूर्ण माहितीसाठी फोन करा आणि समक्ष भेटा