Monday, 29 February 2016

म्युचल फंड आणि tax benefit, वाचा आणि शेअर करा !

गुंतवणूकदारांना बऱ्याचदा असा प्रश्न पडतो कि आपण ज्या म्युचल फंडमध्ये गुंतवणूक केली आहे त्याचा फायदा सेक्शन 80C अंतर्गत आपल्याला नक्की मिळेल ना ? तर हा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे कारण बहुतांशी लोक फक्त tax benefit मिळावा या उद्देशानेच म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करतांना दिसतात. परंतु फक्त काही प्रकारच्या म्युचल फंडमध्ये केलेली गुंतवणूकच तुम्हाला 80C अंतर्गत करसवलत देऊ शकते आणि आपण निवडलेला म्युचल फंड जर नेमका त्या प्रकारामध्ये मोडत नसेल तर आपणाला 80C चा कोणताही फायदा मिळू शकणार नाही. 

त्यामुळे म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वीच आपण सर्व माहिती व्यवस्थित घेणे अतिशय महत्वाचे असते. तसेच कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणुकीचा एक आराखडा तयार असणे गरजेचे असते. एकदा गुंतवणूक केली कि नंतर त्यास सुधारणे अतिशय अवघड आणि नुकसानदायक ठरू शकते.
तर आपण पाहूया असे फंड्स ज्यात tax benefit मिळू शकते;
Equity Linked Savings Scheme: इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम  प्रकारच्या फंड मध्ये जास्तीत जास्त एक लाख रुपयांची गुंतवणूक सेक्शन 80C अंतर्गत मोडते. आपण जर सिप किंवा SIP द्वारे गुंतवणूक करीत असाल तरी ते चालू शकते. साधारणतः ELSS मध्ये तुम्हाला कमीतकमी तीन वर्षे तुमची गुंतवणूक ठेवावीच लागते, म्हणजेच काढता येत नाही परंतु हा कालावधी तसा PPF किंवा NSC पेक्षा बराच कमी आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. 
इतर सर्व स्कीम / फंड प्रमाणेच या प्रकारच्या फंड मध्ये देखील डिव्हीडन्ट आणि ग्रोथ असे दोन्ही पर्याय  उपलब्ध आहेत. 
Rajiv  Gandhi Equity Savings Scheme (RGESS) तसेच काही Pension Plan (निवृत्ती योजना ) देखील करसवलत देऊ शकतात.
फक्त tax benefit साठी कोणतीही गुंतवणूक करू नका, तर तुमचा पैसा महागाईच्या भविष्यातील दरापेक्षा जास्त पटीने कसा वाढेल याचा देखील विचार केला गेला पाहिजे, त्याच सोबत फक्त म्युचल फंड किंवा फक्त जमीन किंवा फक्त सोने अशी एकाच प्रकारची गुंतवणूक करणे टाळून, सर्व प्रकारांमध्ये योग्य मार्गदर्शनाखाली केलेली गुंतवणूक तुम्हाला खात्रीशीर श्रीमंत बनवू शकते. 
बरेचसे मोठे / धनाढ्य गुंतवणूकदारदेखील त्यांच्या इतर गुंतवणुकिंसोबतच म्युचल फंडमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात ज्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांचा पोर्टफ़ोलिओ परीपूर्ण बनतो.
तर आजच आम्हाला भेटण्यासाठी आमची वेळ घ्या
शिरीष कुलकर्णी 
श्रद्धा फिन-सॉल 
कृष्ण लिला चेम्बर्स, 
2रा मजला, टिळक रोड,
स.प. महाविद्यालयासमोर, पुणे 30
फोन : 9822513801